मुंबई,12 मे- मनोरंजनसृष्टी आणि क्रिकेट यांचं फार जुनं नातं आहे. क्रिकेटर असो किंवा कलाकार काही ना काही कारणाने एकमेकांच्या संपर्कात येतच राहतात. असंच काहीसं आता धोनीसोबतसुद्धा झालंय. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) देशभरात मोठा चाहतावर्ग आहे.तसेच तामिळनाडूमध्ये त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये (Chennai Super Kings) बोली जिंकल्यानंतर त्याने दक्षिणेतील लोकांची मने जिंकली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला तेथील लोक प्रेमाने थाला आणि नेता म्हणून संबोधतात. दरम्यान आता धोनीबद्दल बातम्या येत आहेत की तो तामिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे.पण अभिनेता नव्हे तर एक निर्माता म्हणून तो आपली नवी इनिंग सुरु करणार आहे. यासाठी त्याने साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री नयनताराशी (Nayanthara) हातमिळवणी केल्याचं म्हटलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, धोनीच्या पहिल्या तामिळ चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत असेल आणि सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांचा जवळचा सहकारी संजय त्याच्यासोबत असेल. असं सांगण्यात येत आहे. धोनीच्या पहिल्या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत आहे आणि त्याची अधिकृत घोषणा आयपीएलनंतर केली जाऊ शकते.क्रिकेटनंतर धोनी आता तामिळ चित्रपटसृष्टीत उतरणार आहे.यापूर्वी हा क्रिकेटर त्याच्या बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये सहभागी झाला होता. त्याच्या या चित्रपटाने तामिळनाडूमध्ये चांगली कामगिरी केली होती.त्यामुळे आता निर्माता बनून तो प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
आपल्या सर्वानांच माहिती आहे, धोनीच्या बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने आपल्या अभिनयाने आणि साधेपणाने धोनीचे आयुष्य पडद्यावर उत्तम दाखविलं होतं. याशिवाय अलीकडेच माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंहनेही तामिळ चित्रपट 'डिक्किलूना'मध्ये कॅमिओ केला होता आणि 'फ्रेंडशिप' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याचवेळी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण विक्रमच्या कोब्रा या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून चित्रपटांमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे.परंतु हा रिअल हिरो पडद्यावर एक खलनायक म्हणून झळकणार आहे. तोपर्यंत आता धोनीसुद्धा या यादीत समाविष्ट झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, MS Dhoni, South actress, South film