मुंबई, 05 ऑगस्ट: कुंकू, अग्निहोत्र सारख्या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. आपल्या उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्यावर मृण्मयीनं प्रेक्षकांची मन जिंकली. फार कमी वेळात मृण्मयीनं यशाचं शिखर गाठलं. उत्तम उत्तम व्यक्तिरेखा साकारत अभिनेत्री मृण्मयी लेखिका आणि दिग्दर्शिका देखील झाली. 2019मध्ये मृण्मयीनं स्वप्निल राव बरोबर लग्नगाठ देखील बांधली. विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री असलेल्या मृण्मयीनं अरेंज मॅरेज केलं आहे. एका मॅट्रीमोनी साइटवर स्वप्निल आणि मृण्मयीची ओळख झाली. मृण्मयीसाठी हा प्रवास फारच अनोखा आणि महत्त्वाचा ठरला आहे. अभिनेत्रीनं नुकताच त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सगळ्यांबरोबर शेअर केली आहे. त्याचप्रमाणे खरं प्रेम काय असतं हे देखील मृण्मयी सांगताना दिसतेय.
मृण्मयीनं एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती फार सुंदर पद्धतीनं तिच्या आणि स्वप्निलच्या प्रेमाचा प्रवास थोडक्यात पण मजेशीर पद्धतीनं सांगतेय. मृण्मयीनं म्हटलंय, 'प्रेम म्हणजे नक्की काय? ग्रँड जेश्चर? रोमँटिक डिनर? मलाही आधी असंच वाटायचं की प्रेम म्हणजे हेच, एवढंच. पण नंतर मी स्वप्नीलला भेटले. माझा नवरा आणि त्याच्यामुळे मला कळलं की प्रेम मोठ्या मोठ्या नाही तर प्रेम म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. जसं त्याला बरोबर माहिती असतं की मला काय आवडतं. किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये कशी रिएँक्ट करणार आहे. खरं प्रेम हेच असतं ज्यानं आयुष्य खूप सोपं,सुंदर आणि गोड होतं'.
हेही वाचा -
Top 10 Marathi Serial: आई कुठे काय करतेला 'ही' मालिका देतेय टक्कर; अरुंधती पुन्हा तिसऱ्या नंबरवर
मृण्मयीनं तिच्या आणि स्वप्निलच्या पहिल्या भेटीविषयी आणि तिनं त्याला होकार कसा दिला याविषयी देखील सांगितलं. मृण्मयी आणि स्वप्निल यांचं अरेंज मॅरेज आहे. पण त्यांच्याकडे पाहून असं कधीचं वाटत नाही. मृण्मयी त्यांच्या पहिल्या भेटीविषयी म्हणाली, 'मला आमची पहिली भेट आजूनही लख्ख आठवतेय. खूप दिवस आम्ही मॅट्रीमोनी वरती बोलल्यानंतर भेटलो. 6 डिसेंबरला संध्याकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी भेटलो आणि 8 वाजून 35 मिनिटांनी मला माहिती होत की 'ही इज द वन'.
'आम्ही एकत्र मोठे होतोय कायम एकमेकांबरोबर. आजवरच्या प्रवासात खूप सुंदर आठवणी तयार केल्या आहेत. मॅट्रीमोनी अँप आणि देवाचे मी रोज आभार मानते त्यांच्यामुळे स्वप्निल माझ्या आयुष्यात आला', असं मृण्मयीनं शेवटी म्हटलं. मृण्मयी आणि स्वप्निल यांनी पुण्यात शाही विवाह केला होता. दोघांच्या लग्नातील लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.