मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मृण्मयीनं गौतमीला दिलं इतकं महागडं गिफ्ट; आता अभिनेत्रीवर आली नवं काम शोधण्याची वेळ

मृण्मयीनं गौतमीला दिलं इतकं महागडं गिफ्ट; आता अभिनेत्रीवर आली नवं काम शोधण्याची वेळ

Deshpande Sister

Deshpande Sister

मराठी सिनेसृष्टीतील बहिणींची लोकप्रिय जोडी म्हणजे 'देशपांडे सिस्टर्स'. या बहिणी म्हणजेच मृण्मयी आणि गौतमी देशपांडे(Mrunmayee and Gautami Deshpande). दोघेही सतत सिस्टर गोल्स देताना दिसतात.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 19 ऑगस्ट : मराठी सिनेसृष्टीतील बहिणींची लोकप्रिय जोडी म्हणजे 'देशपांडे सिस्टर्स'. या बहिणी म्हणजेच मृण्मयी आणि गौतमी देशपांडे(Mrunmayee and Gautami Deshpande). दोघेही सतत सिस्टर गोल्स देताना दिसतात. याशिवाय सोशल मीडियावरही बऱ्याच सक्रिय असतात. कायम फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतात. यामधून त्यांचं प्रेम प्रेक्षकांना पहायला मिळतं. अशातच गौतमीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये मृण्मयीनं तिला खास गिफ्ट दिल्याचं दिसतंय. हे खास गिफ्ट खूप महागही असल्याचं दिसत आहे. गौतमी देशपांडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयफोन दिसत आहे. हा आयफोन मृण्मयीनं गौतमीला गिफ्ट केला आहे. गौतमी म्हणाली की, जेव्हा तुमची बहिण तुम्हाला 'प्रो' गिफ्ट देते. गौतमीनं स्टोरी शेअर करत या गिफ्टसाठी मृण्मयीला थॅंक्यू म्हटलं आहे. या आयफोनची किंमत लाखांच्या घरात असले.
gautami deshpande
मृण्मयीनं ही स्टोरी बॅक ठेवत गौतमीला भन्नाट असा रिप्लाय दिलाय. यामध्ये मृण्मयीनं म्हटलं की, 'यासाठी आता मला नवीन कामं शोधली पाहिजेत, लई खुट्टा पडलाय'. मृण्मयीचा हा मजेशीर रिप्लाय सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
mrunmayee deshpande
मृण्मयी आणि गौतमीला एकमेकींना त्रास द्यायला जितकी मजा येते तितकंच दोघींचं एकमेकींवर जीवापाड प्रेम सुद्धा आहे. दोघी नेहमीच एकमेकींच्या पाठीशी उभ्या असतात. एकमेकांचं काम तितक्याच मनमोकळेपणाने स्वीकारून त्याला सपोर्ट करताना दिसतात. दोघींनीही जोरदार आणि उत्कृष्ठ अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मृण्मयी ही मोठी बहीण असल्याने ती गौतमीचे खूप लाड करत असते हे आपण वारंवार पाहिलं आहे. हेही वाचा -  Rasika Sunil: 'मी माझं संपूर्ण आयुष्य...'; रसिका सुनीलच्या नव्या पोस्टनं वेधलं लक्ष दरम्यान, झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरांत पोहचलेली सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे . या मालिकेमुळे गौतमीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तर मराठी सिनेसृष्टीत मृण्मयीनं हक्काचं असं स्थान निर्माण केलं आहे. मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच याव्यतिरिक्त ती लेखिका आणि दिग्दर्शिका देखील आहे.
First published:

Tags: Instagram, Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या