मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mrunmayee Deshpande: मृण्मयीनं चाहत्यांना विचारला अनोखा प्रश्न, म्हणाली फक्त चुकीचं उत्तर सांगायचं

Mrunmayee Deshpande: मृण्मयीनं चाहत्यांना विचारला अनोखा प्रश्न, म्हणाली फक्त चुकीचं उत्तर सांगायचं

Mrunmayee Deshpande

Mrunmayee Deshpande

मृण्मयी देशपांडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत मृण्मयीनं चाहत्यांना प्रश्नही विचारलाय. पाहा काय आहे प्रश्न.

  मुंबई, 18 ऑगस्ट : आपल्या उत्तम अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मराठी सिनेसृष्टीत मृण्मयीनं हक्काचं असं स्थान निर्माण केलं आहे. मृण्मयी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच याव्यतिरिक्त ती लेखिका आणि दिग्दर्शिका देखील झाली. एवढंच नव्हे तर तिचा चाहता वर्गही चांगलाच मोठा आहे. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. मृण्मयीनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. मृण्मयी देशपांडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत मृण्मयीनं चाहत्यांना प्रश्नही विचारलाय. मृण्मयीनं लिहिलंय की, 'सांगा मी कुठे आहे?'. या प्रश्नाचं उत्तर फक्त चुकीचंच द्यायचं असंही मृण्मयीनं खाली लिहिलं आहे. मग काय चाहत्यांनी कमेंटचा पाऊस करत चुकीच्या ठिकाणांची नावं लिहायला सुरुवात केली. 'लश्र्मी रोड, पिंपरी मार्केट, दादर भाजी मार्केट, भवानी पेठ, लोहार चाळ, शनिपार चौक', अशा चुकीच्या ठिकाणांची नाव नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलेली दिसली.
  खरं तर मृण्मयीनं शेअर केलेला हा फोटो न्यूयॉर्कमधील आहे. अटलांटा सिटीमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये मृण्मयीचाही समावेश होता. यावेळी मराठी कलाकारांनी आपल्या संस्कृतीचा झंडा परदेशातही फडकला. या कार्यक्रमामध्ये मृण्मयी देशपांडे सुद्धा नृत्याविष्कार सादर करताना दिसली. यामध्ये पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, मृण्मयी देशपांडे, सावनी रवींद्र अशा अनेक कलाकारांचा समावेश होता. हेही वाचा -  Aboli : Aboli : 'अबोली' मालिकेत दहीहंडीची धूम; BTS व्हिडीओ होतोय VIRAL दरम्यान, मृण्मयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करते. ती आणि तिची बहिण गौतमी देशपांडे कायम मजेशीर रील शेअर करतात. दोघींचं बॉन्डिंग आणि विनोदी शैली चाहत्यांना भुरळ घालत असते.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Instagram post, Marathi actress, Marathi entertainment, Social media

  पुढील बातम्या