मुंबई, 21 मार्च- बॉलिवूडसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपल्या अभिनयच्या जीवावर नाव कमावलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मृणालनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. सध्या मृणालची ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर मात्र धुमाकूळ घातला आहे.
मृणाल ठाकूरनं वेगवेगळ्या भूमिका साकारून अभिनयाच्या जीवावर बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आज या अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. टीव्ही ते चित्रपट मृणालने आपल्या दमदार अभिनयाच्या जीवावर खास स्थान निर्माण केले आहे. मृणाल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. दरम्यान, मृणाल ठाकूरचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यात ती रडताना दिसत आहे. या फोटोसोबत मृणाल ठाकूरनं तिच्या मनातलं दुख व्यक्त केलं आहे.
वाचा-सब्यासाची, मनीष मल्होत्राला डावलत स्वरा भास्करने का निवडला पाकिस्तानी डिझायनर?
मृणाल ठाकूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. मृणाल ठाकूरच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमधील फोटोमध्ये ती रडताना दिसत आहे. या फोटोसोबत मृणाल ठाकूरने लिहिले आहे की, 'कालचा दिवस कठीण होता, पण आज मी अधिक मजबूत, समजदार आणि आनंदी आहे, प्रत्येकाच्या कथांची अनेक पाने आहेत, परंतु प्रत्येकजण त्या मोठ्याने वाचत नाही, पण मी माझ्या कथेची पाने मोठ्याने वाचणे निवडत आहे. अशाप्रकारे मृणाल ठाकूरने मनातील गोष्ट सांगितली आहे.
मात्र, या फोटोनंतर लगेचच मृणाल ठाकूरनेही इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये ती म्हणताना दिसत आहे की,काल मला खूप वेगळं आणि असहाय्य वाटत होते. पण आज मी खूप आनंदी आहे.
अलीकडेच मृणाल ठाकूर सुपरस्टार अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या 'सेल्फी' चित्रपटातील 'कुडिए तेरी बाइव'मध्ये दिसली होती. आगामी काळात मृणाल ठाकूर बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत 'गुमराह' चित्रपटात दिसणार आहे. मृणालचा हा चित्रपट 7 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.