मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आमिर खान दररोज खातो पत्नीचा ओरडा; या वाईट सवयीमुळं कुटुंब आहे त्रस्त

आमिर खान दररोज खातो पत्नीचा ओरडा; या वाईट सवयीमुळं कुटुंब आहे त्रस्त

मुलं असतील तर, त्यांना विश्वासात घ्या. मुलांबरोबर दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा करा. नवीन जोडीदारालाही त्याची कल्पना द्या. गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घ्या. म्हणजे दुसऱ्या लग्नानंतर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

मुलं असतील तर, त्यांना विश्वासात घ्या. मुलांबरोबर दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा करा. नवीन जोडीदारालाही त्याची कल्पना द्या. गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घ्या. म्हणजे दुसऱ्या लग्नानंतर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आज 56 वर्षांचा झाला. वयाच्या 11 व्या वर्षापासून आमिरने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. आमिर खानने आपले काका नासिर हुसैन यांच्या' यादों की बारात' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली आहे.

  मुंबई, 14मार्च:  बॉलिवूडचा(bollywood) मि. परफेक्शनिस्ट(mr. perfectionist) आमिर खान(aamir khan birthday) आज 56 वर्षांचा झाला. वयाच्या 11 व्या वर्षापासून आमिरने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. आमिर खानने आपले काका नासिर हुसैन(nasir hussain) यांच्या' यादों की बारात'(yadon ki barat) या चित्रपटात बालकलाकाराची(child actor) भूमिका साकारली आहे. त्यानंतर चुलत भाऊ मन्सूर खान(mansur khan) यांच्यासोबत 'कयामत से कयामत तक'(kayamat se kayamat tak) या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट खूपच यशस्वी ठरला होता.या चित्रपटासाठी आमिरला फिल्मफेअर सुद्धा मिळाला होता.
  आमिरला आपण मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखत असलो तरी, याबद्दल आमिरचं म्हणणं मात्र वेगळचं  आहे. एका मुलाखती दरम्यान आमिरनं आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलताना म्हटलं आहे. माझा आयुष्यात अनुशासन नावाची कोणतीच गोष्ट नाही. मी कोणतीही गोष्ट वेळच्या वेळी किंवा योग्यरित्या करत नाही. तसेच आमिरनं म्हटलं आहे, "मी देवाचं आभार मानतो की त्यानं मला अभिनेता बनवलं त्यामुळे माझं हे आयुष्य चांगल्या पद्धतीने मी जगत आहे."
  "मला माहित नाही का मला सर्व लोकं कठोर अनुशाषित समजतात. लोकांना असं का वाटतं की  मी प्रत्येक गोष्टीला खुपचं गंभीरपणे बघतो. मात्र खरचं बघितलं तर मी या सर्व गोष्टींच्या उलट आहे. मी कोणत्याच बाबतीत कधी गंभीर नसतो. माझी कोणतीच गोष्ट कधी ज्या-त्या वेळेत नसते. माझी पत्नी किरण माझा एकदम विरुद्ध आहे. ती आयुष्याला घेऊन खुपचं अनुशाषित आणि गंभीर आहे. तिला प्रत्येक गोष्ट वेळेत हवी असते. तिचं सगळं काम वेळेतचं असतं. तिला कामच्या बाबतीत किंवा कोणत्याच बाबतीत हेळसांडपणा अजिबात पसंत नाही."
  आमिरनं असंही म्हटलं आहे की, "किरण माझ्या या सवयीनं खुपचं त्रस्त असते. तिला माझ्या स्वभावातील हे गुण अजिबात आवडत नाहीत." आमिरच्या मते तो आपल्या प्रत्येक येणाऱ्या चित्रपटानुसार आपला लुक बदलत असतो. वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असतो. आणि त्याच्या या स्वभावाची आत्ता त्याच्या कुटुंबालाही सवय झाली आहे. आत्ता तेसुद्धा याबद्दल आमिरला काही बोलत नाहीत. त्यांनीसुद्धा आमिरच्या या सवयी मान्य केल्या आहेत.
  या सगळ्या गोष्टी जरी मान्य असल्या, तरी आमिर खान किती मोठा कलाकार आहे हे सर्वांनी मान्य केलं आहे. आमिरने आपल्या प्रत्येक चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या आहेत. विविध सामाजिक विषय पडद्यावर आणले आहेत. त्याच्या या कसदार अभिनयाने तो बॉलिवूड मध्ये मि. परफेक्शनिस्ट असल्याचं सगळ्यांनी मान्य केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood News

  पुढील बातम्या