अजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र

अजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र

अभिनेता अजय देवगण आणि अनिल कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'टोटल धमाल' सिनेमातून ते दोघं एकत्र काम करणार असून याआधी 'तेज' सिनेमातून ते दोघं एकत्र दिसले होते.

  • Share this:

मुंबई 18 जानेवारी : इंद्रकुमार दिग्दर्शित 'धमाल' सिनेमाच्या प्रत्येक सिक्वेलनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यामुळे 'धमाल' आणि 'डबल धमाल' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. म्हणूनच आता इंद्रकुमार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'टोटल धमाल' हा सिनेमा घेऊन येत आहे.

सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून यावेळी चित्रपटात संजय दत्त नव्हे तर अजय देवदण मुख्य भूमिकेत असणार आहेत. धमालच्या पहिल्या सिनेमापासून असलेले काही कलाकर या सिनेमात आहेतच.

हर्षद वारसी, जावेद जाफ्री, रितेश देशमुख, संजय मिश्रा यांच्यासोबतच चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, बोमन इरानी, महेश मांजरेकर असे दिग्गज सेलिब्रिटी असतील. विनोदी कलाकार जाॅनी लिव्हर, राजपाल यादव, सुदेश लेहरी आणि विजय पाटकरसुद्धा सिनेमात हसवायला येणार आहेत. पाहुणे कलाकार म्हणून सिनेमात आमिर खान आणि सोनाक्षी सिन्हा असण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडमधील दमदार कलाकारांची टोळी सिनेमात असल्यामुळे चित्रपट नक्कीच 'टोटल धमाल' असेल अशी आशा आहे. सिनेमाचा ट्रेलर येत्या 21 जानेवारीला येणार असून 22 फेब्रुवारीला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाईल.

नुकतंच सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं असून अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. यासोबत अजय म्हणाला आहे की, 'आजपासून होणार फक्त टोटल धमाल, जंगली विनोदासाठी तयार राहा'.

 

View this post on Instagram

 

Aaj se hoga sirf #TotalDhamaal. Gear up for The Wildest Adventure Ever!! Trailer out on 21st Jan.

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

First published: January 18, 2019, 2:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading