मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एके काळी दोन रुपयांत मिळायचं चित्रपटाचं तिकीट, जाणून घ्या दरवाढीचा प्रवास

एके काळी दोन रुपयांत मिळायचं चित्रपटाचं तिकीट, जाणून घ्या दरवाढीचा प्रवास

आज 23 सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) साजरा केला जातो. मूकपट, ब्लॅक अँड व्हाइट, बोलपट, थिएटर ते आता डिजिटलायझेशननंतर ओटीटी असं चित्रपटांचं बदलतं स्वरुप भारतीय चित्रपटांनी पाहिलंय.

नवी दिल्ली, 23 ,सप्टेंबर : आज 23 सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) साजरा केला जातो. मूकपट, ब्लॅक अँड व्हाइट, बोलपट, थिएटर ते आता डिजिटलायझेशननंतर ओटीटी असं चित्रपटांचं बदलतं स्वरुप भारतीय चित्रपटांनी पाहिलंय. आपल्याकडे ओटीटी हा पर्याय असतानाही आपण थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघतो, इतकी क्रेझ आहे. तिकीटाचे दरही आता खूप वाढले आहेत, पण 70 च्या दशकात तिकीटांचे दर किती होते आणि नंतर ते कशा पद्धतीने वाढत गेले याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. एकेकाळी मधुबाला व दिलीप कुमार यांचा ‘मुघल-ए-आझम’ चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती. त्यावेळी चित्रपटाच्या तिकीटाचे दर फक्त दोन रुपये होते. अकबराच्या भूमिकेतील पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनयाची आजही आठवण काढली जाते. मुंबईतील मराठा मंदिर सिनेमागृहात 1960 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे तिकीटदर कमी असल्याने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला होता. हेही वाचा - Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'साठी रणबीर आणि आलियाने किती घेतलंय मानधन? अयान मुखर्जीने स्पष्टच सांगितलं सुरुवातीला किती होतं तिकीट
‘पाकीजा’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात मीना कुमारी मुख्य नायिका होती आणि राजकुमार मुख्य अभिनेता होता. 1972 साली आलेला हा चित्रपट पाहण्यासाठीही थिएटरबाहेरची लोकांची क्रेझ पाहण्यासारखी होती. या चित्रपटाचं तिकीट त्या काळी लोकांनी 3 रुपये देऊन विकत घेतलं होतं. मुंबईतील मराठा मंदिरातही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. हळूहळू तिकीटांचे वाढले दर कालांतराने महागाई वाढू लागली आणि तिकीटाचे दरही वाढू लागले. 4.95 रुपये, नंतर 6 रुपये, नंतर 7 रुपये आणि वाढत वाढत आज तिकीटाचे दर (Tickets Rate) 500 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त आज पुन्हा एकदा चित्रपट केवळ 75 रुपयांमध्ये देशभरातील प्रेक्षकांना दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील 4 हजारांहून अधिक स्क्रीनवर लोकांना 75 रुपयांमध्ये चित्रपट दाखवले जातील. हे दर फक्त आजच्या दिवसापुरतेच असतील. 75 रुपयांमध्ये चित्रपट कसा पाहायचा 75 रुपयांत तिकीट खरेदीसाठी तुम्हाला चित्रपटगृहांच्या बाहेरून तिकीटं खरेदी करावी लागतील. याशिवाय तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला जीएसटी आणि इंटरनेट फी द्यावी लागेल. सर्वांत आधी अमेरिकेने (America) चित्रपटांच्या तिकीटांचे दर कमी केले होते, तसेच प्रेक्षकांना कमी पैशांत चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला होता. 3 सप्टेंबरला अमेरिकेत नॅशनल सिनेमा डे साजरा केला गेला होता, त्यावेळी फक्त 3 डॉलरमध्ये प्रेक्षकांना चित्रपट दाखवण्यात आले होते.
First published:

Tags: Bollywood, Entertainment, Marathi cinema

पुढील बातम्या