अ‍ॅक्शन... थ्रीलर... रोमान्स, प्रभासच्या बहुचर्चित Saaho चा टीझर रिलीज

अ‍ॅक्शन... थ्रीलर... रोमान्स, प्रभासच्या बहुचर्चित Saaho चा टीझर रिलीज

Saaho टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला. 1मिनिटं आणि 39 सेकंदाच्या टीझरमध्ये प्रभास दिसला अ‍ॅक्शन अवतारात.

  • Share this:

मुंबई, 13 जून : 'बाहुबली'च्या दमदार यशानंतर सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित सिनेमा 'साहो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यावर प्रभासचे चाहते मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभासन त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या सिनेमातील त्याचा फर्स्ट लुक शेअर केल होता. त्यानंतर नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून यामध्ये सुपर स्टार प्रभास पुन्हा एकदा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची लेक करतेय ‘या’ व्यक्तीला डेट, सोशल मीडिया पोस्टमध्ये केला खुलासा

प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या 1मिनिटं आणि 39 सेकंदाच्या टीझरमध्ये प्रभास अ‍ॅक्शन अवतारात दिसत असून श्रद्धा कपूरसोबत संवाद वगळता यामध्ये संपूर्ण टीझरमध्ये प्रभास सिनेमातील खलनायकांशी दोन हात करताना दिसत आहे. चंकी पांडे, नील नितीन मुकेश आणि जॅकी श्रॉफ असे 3 खलनायक या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. याशिवाय अ‍ॅक्शन सोबतच या टीझरमध्ये थ्रीलर, रोमान्स आणि इमोशन्स यांचं मिश्रण पाहायला मिळत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर सुद्धा या सिनेमामध्ये स्टंट सीन करताना दिसणार आहे.

देसी गर्लनं घातली भारताच्या सन्मानात भर, प्रियांका चोप्राला ‘हा’ विशेष पुरस्कार जाहीर

मागच्या काही दिवसांपासून या सिनेमाच्या टीझरविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता दिसून येत होती. आता नुकत्याच रिलीज झालेल्या साहोच्या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे टीझर रिलीज झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे. या सिनेमामध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त महेश मांजरेकर, निल नितिन मुकेश, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे.

सलमान खानसाठी रोहित शेट्टीची माघार, आता 'या' दिवशी रिलीज होणार सूर्यवंशी

हा सिनेमा तेलगूशिवाय हिंदी आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्टला स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर 'साहो' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

==============================================================================

Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान

First published: June 13, 2019, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading