मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘कहो ना...’ विसरून जाल, आता येणार ‘कोरोना प्यार हैं’

‘कहो ना...’ विसरून जाल, आता येणार ‘कोरोना प्यार हैं’

आता 'कोरोना'वर चित्रपट देखील भारतामध्ये येणार आहेत. त्यामुळे 'हे फक्त भारतातच होऊ शकतं', याची पुन्हा एकदा प्रचिती येणार आहे.

आता 'कोरोना'वर चित्रपट देखील भारतामध्ये येणार आहेत. त्यामुळे 'हे फक्त भारतातच होऊ शकतं', याची पुन्हा एकदा प्रचिती येणार आहे.

आता 'कोरोना'वर चित्रपट देखील भारतामध्ये येणार आहेत. त्यामुळे 'हे फक्त भारतातच होऊ शकतं', याची पुन्हा एकदा प्रचिती येणार आहे.

    मुंबई, 16 मार्च : तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, 'हे फक्त भारतातच होऊ शकतं'. अशा अनेक गोष्टी आपल्या आजुबाजुला घडत असतात आणि त्या हे वाक्य म्हणायला मजबूर करतात. कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतात धडकल्यानंतर अशा अनेक गोष्टी घडल्या. मिम्स बनवण्यात तर भारतीयांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यात आपण गाणी बनवली, घोषणा दिल्या इ. अशा अनेक गोष्टी कोरोनामुळे भारतात घडल्या. पण ही बातमी वाचून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल, कारण आता 'कोरोना'वर चित्रपट देखील भारतामध्ये येणार आहेत. त्यामुळे 'हे फक्त भारतातच होऊ शकतं', याची पुन्हा एकदा प्रचिती येणार आहे. (हे वाचा- आता काय बोलायचं? कोरोना जगभरात उच्छाद मांडत असताना या अभिनेत्रीलाआठवली बिअर) बॉलिवूड निर्मात्यांनी अजिबात वेळ न घालवता कोरोनाचा वापर बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी कसा करायचा हे जाणून घेतलं आहे. 'कोरोना' हा शब्द असणारे अनेक फिल्म टायटल रजिस्टर करण्यात आले आहेत. 2000 साली प्रदर्शित झालेला 'कहो ना प्यार हैं..' तर अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटाच्या नावाला वेगळा ट्विस्ट देत 'इरॉस इंटरनॅशनल'ने (Eros International) 'कोरोना प्यार हैं..' (Corona Pyar Hai) असं नाव रजिस्टर केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, IFTPC (Indian Film and Television Producer Council) च्या सूत्रांच्या मते हे नाव गेल्याच आठवड्यात रजिस्टर करण्यात आले आहे. (हे वाचा- OMG! हॉलिवूड कलाकारही कोरोनाच्या रडारवर, जेम्स बाँडमधील अभिनेत्रीला झाली लागण) निर्मात्या क्रिशीका लुल्ला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप या प्रोजेक्टच्या स्क्रिप्टिंगचं काम सुरू आहे.  देशातील सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर या प्रोजेक्टचं काम सुरू होईल. कोरोना प्यार हैं...  ही एक लव्ह स्टोरी असणार आहे. IFTPC ने दिलेल्या माहितीनुसार याव्यतिरिक्त कोरोना संबंधित अनेक नावं त्यांच्याकडे  रजिस्ट्रेशनसाठी आली आहेत. 'डेडली  कोरोना' (Deadly Corona) हे त्यापैकी एक आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या