टायगरला या खास नावानं हाक मारते कृती सेनन, काय असेल गर्लफ्रेंड दिशा पाटनीची प्रतिक्रिया?

टायगरला या खास नावानं हाक मारते कृती सेनन, काय असेल गर्लफ्रेंड दिशा पाटनीची प्रतिक्रिया?

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन आणि टायगर श्रॉफ यांच्या बॉलिवूड पदार्पणाला नुकतीच 5 वर्ष पूर्ण झाली.

  • Share this:

मुंबई, 24 मे : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन आणि टायगर श्रॉफ यांच्या बॉलिवूड पदार्पणाला नुकतीच 5 वर्ष पूर्ण झाली. या निमित्त टायगर आणि कृती दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा देत या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कृतीनं बॉलिवूडमधील तिच्या पहिल्या को-स्टारबद्दल नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर राहील असं म्हणत टायगरच्या खास नावाचा उल्लेख तिच्या पोस्टमध्ये केला.

टायगर आणि कृतीनं 2014 मध्ये थ्रिलर सिनेमा 'हिरोपंती'मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. कृतीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मी त्याची प्रचंड मेहनत, शिस्त आणि कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा पाहिला आहे. मला माहीत आहे तो नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यासाठी माझ्या मनात नेहमीच एक सॉफ्त कॉर्नर राहील टिग्गी! तुला असं काम करताना पाहून मला खूप आनंद होतो' तिच्या या पोस्ट वरून कृती त्याला टिग्गी या खास नावानं हाक मारते हे समजलं. पण आता यावर टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनी काय प्रतिक्रिया देते याची सर्वांना उत्सुकता आहे.
 

View this post on Instagram
 

We started out together.. in the same boat, equally excited, equally lost, equally fascinated by this world..I saw his hardwork, his discipline and passion and i knew he’s gonna blow people’s minds away! You’ll always have this super soft corner in my heart Tiggyyy!❤️ @tigerjackieshroff i feel so so happy seeing you fly higher and higher(literally too!) Happy 5year Anniversary lol.. i feel its time for Heropanti2 .. What say? ❤️


A post shared by Kriti (@kritisanon) on

याशिवाय टायगरनंही त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. 'बॉलिवूडमध्ये आणि हिरोपंतीला 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा माझी क्राइम पार्टनर. 5 वर्षांपूर्वी एकत्र सुरुवात केली होती. काही अनुभव घेतले. तुला अशाप्रकारे पुढे जाताना पाहून मला अभिमान वाटतो. हो 'हिरोपंती 2' ची मी सुद्धा वाट पाहतोय.' अशा शब्दात टायगरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या. या दोघांच्याही पोस्टवरून त्यांच्यातील घट्ट मैत्रीचं नातं लक्षात येतं.
'हिरोपंती' या सिनेमाची कथा रेणु नावाच्या एका मुलीभोवती फिरते. जी आपल्या प्रियकरासोबत पळून जाते. त्यानंतर मुलीचे वडील चौधरी बबलू आणि त्याच्या मित्रांना पकडून आणतात. कारण त्यांना माहीत असतं की, रेणु कुठे आहे. पण यादरम्यान बबलू चौधरीच्या लहान मुलीच्या प्रेमात पडतो. पदार्पणातच टायगर आणि कृतीचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. सध्या कृती 'पानिपत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर टायगर लवकरच ऋतिक रोशनसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.


सलमानला मोठ्या पडद्यावर साकारायची आहे 'या' क्रूर खानाची व्यक्तिरेखा


India's Most Wanted च्या स्क्रिनिंगला अर्जुनच्या 'या' सावत्र बहिणीबरोबर वाढलं मलायकाचं बाँडिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या