S M L

लक्ष्मी अग्रवालच्या बायोपिकमधील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज

दिल्लीच्या गरीब कुटुंबातील १६ वर्षांच्या लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने (वय ३२) लग्नाची मागणी घातली होती. पण नकार मिळाल्यानं त्यानं लक्ष्मीवर अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला.

Updated On: Mar 25, 2019 01:48 PM IST

लक्ष्मी अग्रवालच्या बायोपिकमधील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई, 25 मार्च : 'पिकू', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आता वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'छपाक' असं सिनेमाचं नाव असून यासाठी दीपिका विशेष मेहनत घेतली आहे. आज 25 मार्च पासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होत आहे. पण त्याआधी दीपिकानं लक्ष्मीच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि आता या सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

दीपिकाने नुकताच या सिनेमातील तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला. 'छपाक'मधील आपला लूक इन्स्टाग्रामवर शेअर करताना दीपिकानं, 'ही भूमिका शेवटपर्यंत माझ्यासोबत राहील' असं कॅप्शनही दिलं आहे. 'राझी' सारख्या यशस्वी सिनेमानंतर दिग्दर्शिका मेघना गुलजार 'छपाक'चं दिग्दर्शिन करत आहे. दीपिका पदुकोण लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा 'मालती' या नावाने साकारणार आहे. विशेष म्हणजे मुख्य व्यक्तिरेखा साकारणारी दीपिका या सिनेमाची निर्माती देखील आहे.





 

Loading...





View this post on Instagram




 

A character that will stay with me forever...#Malti Shoot begins today!#Chhapaak Releasing-10th January, 2020. @meghnagulzar @foxstarhindi @vikrantmassey87


A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on





दिल्लीच्या गरीब कुटुंबातील १६ वर्षांच्या लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने (वय ३२) लग्नाची मागणी घातली होती. पण नकार मिळाल्यानं त्यानं लक्ष्मीवर अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे चेहरा विद्रुप झाला मात्र यामुळे निराश न होता लक्ष्मीनं २००६ मध्ये जनहित याचिकेद्वारे अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी विशेष कायदे असावेत अशी मागणी केली. अंगावर अ‍ॅसिड फेकण्याचा उल्लेख असलेले कलम सध्याच्या फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत असावे यासाठी आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या तिनं न्यायपीठापुढे मांडल्या. तिच्या मागणीला यश आलं २०१३ मध्ये केंद्र सरकारने विशेष कायदा आणला. तिच्या या संघर्षाची कहाणी 'छपाक'मधून 10 जानेवरी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 01:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close