Home /News /entertainment /

Mouni Roy Wedding: स्वत:च्याच लग्नात घाबरुन ओरडू लागली मौनी रॉय, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

Mouni Roy Wedding: स्वत:च्याच लग्नात घाबरुन ओरडू लागली मौनी रॉय, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

सध्या सोशल मीडियावर अशाच अजून एका लग्नाची चर्चा रंगली आहे, त्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओज व्हायरल होतायत. ते लग्न म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार (Mouni Roy Wedding) यांचं.

मुंबई, 28 जानेवारी: सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. यात आपले सेलिब्रिटीही मागे कसे राहतील. गेल्या महिन्यात विकी कौशल आणि कॅटरिना कैफ (Vicky Kaushal and Katrina Kaif) यांच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत होती. सध्या सोशल मीडियावर अशाच अजून एका लग्नाची चर्चा रंगली आहे, त्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओज व्हायरल होतायत. ते लग्न म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार (Mouni Roy Wedding) यांचं. मौनी आणि सूरजच्या लग्नात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि फिल्म इंडस्ट्रीतील काही जवळचे मित्र यांचीच उपस्थिती होती. मौनीच्या लग्नात मीत ब्रदर्समधला मनमितसिंह हा देखील सहभागी झाला होता. या लग्नाच्या विधींमध्ये मोठा भाऊ म्हणून मनमितच उपस्थित होता. शिवाय मौनीचा बेस्ट फ्रेंड कोरिओग्राफर राहुल शेट्टी देखील लग्नाच्या विधींमध्ये सहभागी झाला होता. मौनी आणि सूरजच्या या ‘टू-स्टेट्स वेडिंग’मध्ये आधी मल्याळी पद्धतीनुसार दोघांचं लग्न झालं व त्यानंतर बंगाली पद्धतीनुसार सप्तपदीचे विधी करण्यात आले. या सगळ्या विधींमधला मौनीचा एक व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. हे वाचा-'मी 40 पुशअप्स काढेन' परंतु.. नेटकऱ्याने मिलिंद सोमणला दिलं भलतंच चॅलेंज व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील विधीला ‘शुभो दृष्टी’ असं म्हणतात. यावेळी लाल रंगाचा लेहंगा घातलेल्या मौनीला पाटावर बसवून मांडवात घेऊन येत आहेत असं व्हिडीओत दिसतंय. या लाकडी पाटाला तिच्या भावांनी उचलून धरलंय. या विधीच्या वेळी, मांडवात येताना, नवऱ्या मुलीचा चेहरा विड्याच्या पानांनी झाकलेला असतो. मौनी जेव्हा अशी पाटावर बसून, आपला चेहरा विड्याच्या पानांनी झाकून आणि त्या पानांच्या आडून हळूच सूरजला बघत मांडवात येत होती, आणि त्यावेळी ती अचानक घाबरली असं व्हिडीओत दिसतंय. नक्की काय घडलं? तर विधीनुसार पाटावर बसवून मौनीला मांडवाला सात फेरे मारायचे असतात. यावेळी मौनीने आपला चेहरा विड्याच्या पानाने झाकला होता. पण या विधीच्या वेळी मौनीला उचलून घेतलं होतं त्यामुळे ती खूपच घाबरली आणि तिने लोकांना मदतीसाठी हाक मारायला सुरुवात केली. मौनीला वाटले की ती आता आपण पाटावरून खाली पडू म्हणून ती आपल्या भावांना सातऐवजी एकच फेरी मारण्यास सांगताना या व्हिडिओमध्ये दिसून येते. पण खरं तर तिच्या भावांनी आपली बहीण पडू नये याची पूर्ण काळजी घेतली होती. हे वाचा-Twinkle Khanna ने चक्क 'या'सोबत केली अक्षयच्या पांढऱ्या दाढीची तुलना मौनीचा हा घाबरलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अतिशय कमी संख्येत हे लग्न पार पडलं. पण त्यांनी मल्याळी आणि बंगाली दोन्ही पद्धतीतील सगळे विधी केले.
First published:

Tags: Bollywood actress, Television

पुढील बातम्या