Home /News /entertainment /

मौनी रॉयने शेअर केला हनिमून ट्रीपचा सुंदर VIDEO, पतीसोबत बर्फात करतेय धम्माल

मौनी रॉयने शेअर केला हनिमून ट्रीपचा सुंदर VIDEO, पतीसोबत बर्फात करतेय धम्माल

Bollywood news: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) मौनी रॉयने (Mouni Roy) पती सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) तिच्‍या हनीमूनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आता अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 12 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री  (Tv Actress)  मौनी रॉयने   (Mouni Roy)  पती सूरज नांबियारसोबत   (Suraj Nambiar)  तिच्‍या हनीमूनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आता अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.ज्यामध्ये ती बर्फाने लादलेल्या सुंदर निसर्गाची झलक आपल्याला दाखवत आहे. अभिनेत्रीने हनिमूनसाठी   (Honeymoon)  पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरची निवड केली आहे. मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला आणि सूरजचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काश्मीरचा निसर्ग बर्फाने संपूर्ण झाकलेला दिसत आहे. जिथे-जिथे नजर जाते तिथे-तिथे बर्फाची सुंदर चादर ओढलेला निसर्ग दिसून येत आहे. यावरून अंदाज लावता येतो की त्याठिकाणी किती थंडी असेल. परंतु ही अभिनेत्री थंडीतही तिच्या आयुष्यातील सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने काही तासांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर दीड लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. अभिनेत्रीचे चाहते हार्ट इमोजी शेअर करून प्रेम व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'तुम्ही दोघे खूप सुंदर दिसता.' दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, 'मला तुमच्यासारखं व्हायचं आहे.'व्हिडिओमध्ये, तुम्ही मौनीला पती सूरजसोबत बर्फाच्छादित प्रदेशाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेताना पाहू शकता. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर सुंदर संगीत वाजत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही कमेंट करून या जोडप्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. मौनीने व्हिडिओमध्ये लोकेशनची सुंदर झलक दाखवली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by mon (@imouniroy)

  या व्हिडिओमध्ये सुंदर बर्फाच्छादित प्रदेश दिसत आहे. जो कोणाचंही मन मोहून टाकेल. थंडीपासून वाचण्यासाठी जोडप्यानं उबदार कपड्यांसह मोठा चष्मा घातला आहे. 27 जानेवारीला मौनी रॉयने तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत गोव्यात सात लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे मौनी रॉयने दोनदा लग्न केलं होतं. प्रथम त्यांनी दक्षिण भारतीय पद्धतीनुसार लग्न केलं. त्यानंतर त्यांनी बंगाली पद्धतीने लग्न केलं होतं. मौनीचे दोन्हीही लुक जबरदस्त होते. अभिनेत्रींच्या लग्नापासून ते हनिमूनपर्यंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marriage, Tv actress, Wedding

  पुढील बातम्या