मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: मौनीनं दिला सलमानला नकार; डान्स न केल्यामुळं भाईजाननं दिला धक्का

VIDEO: मौनीनं दिला सलमानला नकार; डान्स न केल्यामुळं भाईजाननं दिला धक्का

मौनीनं सलमानसोबत डान्स करण्यास साफ नकार दिला आहे. सलमानला नकार देतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Mouni Roy Salman Khan dance)

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 मार्च: टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखील झळकताना दिसत आहे. आपल्या जबरदस्त डान्सच्या जोरावर या आयटम गर्लनं प्रेक्षकांना अक्षरश: चकित केलं आहे. त्यामुळं या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत डान्स करण्याची इच्छा बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं देखील व्यक्त केली होती. मात्र मौनीनं त्याच्यासोबत डान्स करण्यास साफ नकार दिला आहे. सलमानला नकार देतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Mouni Roy Salman Khan dance)

हा व्हिडीओ मौनीच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मौनी स्टेजवर डान्स करताना दिसतेय. तेवढ्यात तिच्यामागून सलमान येतो अन् तिच्यासोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त करतो. परंतु मौनी त्याला नकार देते. आणि मागे फिरते तेवढ्यात सलमान तिला मागून धक्का मारतो. खरं तर या व्हिडीओमध्ये सलमान मौनीची गंमत करताना दिसत आहे. हा थ्रोबॅक व्हिडीओ 2017 मध्ये आयोजित केलेल्या चॅट शो सुपर नाईट विथ ट्यूबलाईट या शोमधील आहे.

अवश्य पाहा - या मराठी चित्रपटानं मारली बाजी; ‘राष्ट्रीय पुरस्कारा’वर कोरलं नाव

View this post on Instagram

A post shared by @arniholic_143

मौनी रॉय येत्या काळात ब्रम्हास्त्र या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन हे कलाकार मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसतील. शिवाय यानंतर ती सलमानच्या राधे या चित्रपटात देखील झळकणार आहे. तिनं अक्षय कुमारच्या गोल्ड या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली गेली होती.

First published:

Tags: Dance video, Entertainment, Salman khan