मुंबई, 8 मार्च : बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चांना सुरूवात होते. छोट्या पडद्यावरुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनी रॉयच्या बाबतीतही काहीसं असंच घडतंय. मागच्या काही दिवसांपासून मौनीचं नाव दिग्दर्शक अयान मुखर्जी सोबत जोडलं जातंय. मौनी अनेकदा अयान सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधील या दोघांची जवळीक पाहता मौनी अयानच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातंय.
'मुंबई मिरर'ला दिलेल्या एका मुलाखतीत मौनीला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारण्यात आलं. यावेळी उत्तर देताना तिनं आपल्या अफेअरच्या चर्चा फेटाळून लावल्या. मौनी म्हणाली, 'जे लोक माझ्या आयुष्यात खूप जवळचे आहेत त्यांना माहीत आहे की मी सिंगल आहे. याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे यासाठी वेळ नाही. आपण कमी वेळातही आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोबत घेऊन चालू शकतो. पण मला एक योग्य व्यक्तीची गरज आहे. मी असं कोणालाही डेट करु शकत नाही. सध्या मी खूप खूश आहे. मला चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळत आहे आणि मी या संधीचा पूर्ण वापर करु इच्छिते.'