Motichoor Chaknachoor Trailer : नवाझुद्दीन-आथियाचा रोमान्स पाहून आवरणार नाही हसू

नवाझुद्दीन सिद्दकी आजकाल अ‍ॅक्शन सिनेमा सोडून रोमँटिक सिनेमाचा हिरो झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 06:22 PM IST

Motichoor Chaknachoor Trailer : नवाझुद्दीन-आथियाचा रोमान्स पाहून आवरणार नाही हसू

मुंबई, 11 ऑक्टोबर : नवाझुद्दीन सिद्दकी आजकाल अ‍ॅक्शन सिनेमा सोडून रोमँटिक सिनेमाचा हिरो झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत व्यक्त केली होती. लवकरच नवाज मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. पण समस्या अशी आहे की, त्याला यावेळीही त्याचं हे स्वप्न पूर्ण होईल असं दिसत नाही.

नवाजचा आगामी सिनेमा 'मोतीचूर चकनाचूर'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ज्यात नवाज खलनायकी छवी सोडून थोड्याश्या हटके आणि मजेदार अंदाजात दिसत आहे. या सिनेमात तो अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

'ती' एकमेव मुलाखत, ज्यात रेखासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलले अमिताभ!

'मोतीचूर चकनाचूर'चा हा ट्रेलर खूपच मजेदार आहे. 36 वर्षीय पुष्पेंद्र त्यागी कोणत्याही परिस्थित लग्न करण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे अ‍ॅनी जिला फक्त अशा मुलाशी लग्न करायचं आहे जो तिला परदेशात फिरायला घेऊन जाईल. परदेशात फिरायला जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेवटी नेपाळ, भूटान किंवा बांग्लादेशातही फिरायला जायला तयार होते. ट्रेलर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हा ट्रेलर खूप रंजक आहे. सध्या बॉलिवूडमध्ये कॉमेडीचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे हा सुपरहिट फॉर्म्यूला या सिनेमातही वापरण्यात आला आहे.नवाझुद्दीन सिद्दीकीचा हा सिनेमा 15 नोव्हेंबरला प्रेक्षकंच्या भेटीला येणार आहे. देबामित्र बिश्वाल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर सिनेमाची निर्मिती राजेश भाटिया आणि किरण भाटिया यांनी केली आहे.

Loading...

KBC च्या सोप्या प्रश्नावर टीचर एज्यूकेटर झाली फेल, हॉट सीटवरच कोसळलं रडू

=========================================================

VIDEO: ड्रग्ज माफियांचा पोलिसांवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...