• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या

सोनू सूद आईच्या आठवणीनं झाला भावुक; शेअर केल्या अविस्मरणीय चिठ्ठ्या

सोनूनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे आईसोबतचे फोटो आणि आईनं हातांनी लिहिलेल्या काही चिठ्ठ्या आहेत.

 • Share this:
  मुंबई 10 मे: 9 मे हा रविवारचा दिवस संपूर्ण जगात मातृ दिन (Mother's Day) म्हणून साजरा करण्यात आला. देशभरातील अनेक भारतीय सेलिब्रिटींनी देखील आपल्या आईसोबतचे खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट करत आईला मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांमध्ये अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) दिलेल्या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या आईनं तो मुंबईत आल्यावर काही पत्र त्याला पाठवली होती. (sonu sood video) ही पत्र त्यानं शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याच्या या आठवणी पाहून कदाचित तुम्ही देखील भावुक व्हाल. सोनूनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे आईसोबतचे फोटो आणि आईनं हातांनी लिहिलेल्या काही चिठ्ठ्या आहेत. शिवाय या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला तारे जमिन पर या चित्रपटातील मा हे गाणं प्ले होत आहे. या व्हिडीओद्वारे त्यानं आपल्या आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत सोनूला मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘देशातील आरोग्य व्यवस्थेनं माझ्या कुटुंबीयांचा खून केलाय’; मीरा चोप्रा संतापली सोनूच्या आईचं नाव सरोज सूद असं होतं. त्या कॉलेजमध्ये शिक्षिका होत्या. कोरोना काळात सोनूनं अनेकांना मदत केली. दरम्यान त्यानं आपल्या गावात एक रस्ता बांधला. अन् या रस्त्याला त्यानं आपल्या आईचं नाव दिलं. याच मार्गावरुन त्याची आई प्रवास करायची. आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यानं हा रस्ता बांधला आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: