S M L
Football World Cup 2018

जास्तीत जास्त भारतीयांना दीपिकासोबत जायचंय फिरायला

53 टक्के लोकांना दीपिकासोबत सुट्टीवर जायचंय. तर 40 टक्के लोकांना प्रियांका चोप्राबरोबर फिरायला जायला आवडणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 6, 2017 02:10 PM IST

जास्तीत जास्त भारतीयांना दीपिकासोबत जायचंय फिरायला

06 एप्रिल : आपल्याकडे प्रत्येकाचीच इच्छा असते बाॅलिवूड स्टार्ससोबत फिरायला जायला. एका सर्वेक्षणानुसार कळलंय की जास्तीत जास्त भारतीयांना दीपिका पदुकोणसोबत फिरायला जायला आवडेल.

53 टक्के लोकांना दीपिकासोबत सुट्टीवर जायचंय. तर 40 टक्के लोकांना प्रियांका चोप्राबरोबर फिरायला जायला आवडणार आहे. हाॅटेल्स डाॅट काॅमनं हे सर्वेक्षण केलंय. त्यात सनी लिआॅन तिसऱ्या नंबरवर आहे.

चौथ्या नंबरवर आहे जॅकलीन फर्नांडिस आणि आलिया भट्ट पाचव्या नंबरवर आहे.

पुरुष सेलिब्रिटींबद्दलही मतं आजमावून पाहिलीत. त्यात नंबर वनवर आहे अमिताभ बच्चन. जास्त लोकांना बिग बींबरोबर सुट्टीवर जायचंय. तर सचिन तेंडुलकर दुसऱ्या नंबरवर आहे. त्यानंतर रणबीर कपूर, विराट कोहली यांना पसंती मिळालीय.

या सर्वेक्षणात 300 भारतीयांनी भाग घेतलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close