मुंबई, 08 जून- अभिनेत्री सौंदर्या शर्माने तिच्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. सौंदर्याच्या घरी अचानक एक माकड घुसलं आणि त्याने घरात हैदोस घातला. सुरुवातीला माकड जमिनीवर बसून काही खात होता. त्यानंतर तो खुर्ची आणि टेबलवर चढून तिथे ठेवलेली फळं खायला लागतो. माकडाचं त्या घरात फिरणं पाहून तो कोणालाही घाबरत नसल्याचं स्पष्ट कळतं.
सौंदर्याने व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, ‘ठग लाइफ, हा सकाळी माझ्या खोलीत घुसला आणि नाश्ता करायला लागला. नाश्ता झाल्यावर त्याने माझ्या बेडवर आरामही केला. मी फक्त ओरडत होती आणि व्हिडिओ घेत होती. कारण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नव्हता.’
‘ए तू नाचणं थांबव, खूप वाईट नाचतेस…’ ट्रोलर्सच्या कमेंटवर अभिनेत्रीने दिली भन्नाट प्रतिक्रिया
कॅलिफोर्निया कॉन्सर्टमधील अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?
सौंदर्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला. एका युझरने लिहिले की, ‘त्याचं स्वागत करा.. कारण पाहुणा हा देवासारखा असतो.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘अतिथी तुम्ही कधी जाणारा.’ सौंदर्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या रांची डायरीजमध्ये तिने काम केलं होतं. सिनेमात तिच्यासोबत हिमांश कोहली आणि अनुपम खेर होते. सौंदर्याला या सिनेमासाठी अनेक नामांकनं मिळाली होती.
VIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी