Home /News /entertainment /

बावरीनं का सोडलं Taarak Mehta Ka Ooltah Chashmah? सांगितलं धक्कादायक कारण

बावरीनं का सोडलं Taarak Mehta Ka Ooltah Chashmah? सांगितलं धक्कादायक कारण

“गलती से मिस्टेक हो गयी” या डायलॉगमुळे ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली होती. खरं तर तारक मेहतामुळेच ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. तरी देखील तिनं मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

    मुंबई 11 जुलै: तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना देखील अभिनेत्री मोनिका भदोरिया (Monika Bhadoriya) हिने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत ती बागाची प्रेयसी बावरीची भूमिका साकारत होती. “गलती से मिस्टेक हो गयी” या डायलॉगमुळे ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली होती. खरं तर तारक मेहतामुळेच ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. तरी देखील तिनं मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. वडिलांनीच केली सलमानची पोलखोल; सलीम खानपेक्षा या व्यक्तीला अधिक आदर देतो भाईजान मोनिकानं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने तारक मेहता सोडण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “तारक मेहतानं मला लोकप्रियता मिळवून दिली. यामुळे अनेक जण आता मला माझा खऱ्या नावाऐवजी बावरी म्हणूनच ओळखतात. परंतु एकाच प्रकारची भूमिका दिर्घ काळ केल्यामुळे कामात तोचतोचपणा जाणवत होता. मला आता वेगळ्या काही भूमिका देखील करून पाहायच्या आहेत. विशेषत: मला गंभीर व्यक्तिरेखा साकारून पाहायचं. अन् त्यासाठी मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात प्रेक्षकांना मी दुसऱ्या एखाद्या सीरिजमध्ये काम करताना नक्की दिसेन.” 'मुलीपण अशा नाचतात का?' भाग्यश्रीचा मॉर्निंग डान्स पाहून फॅन्स झाले क्रेझी मोनिकानं मालिका सोडल्यामुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. तिनं मानधनात वाढ करायला सांगितली त्यामुळे निर्मात्यांनी दिला काढून टाकलं अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली. या चर्चेमुळे काही प्रेक्षकांनी तर निर्मात्यांवर टीका देखील केली होती. मात्र अखेर बावरीनं स्वत: मालिका सोडण्याचं कारण सांगितलं. येत्या काळात बावरीच्या भूमिकेत इतर दुसरी अभिनेत्री झळकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Comedy actor, Taarak mehta ka ooltah chashma, Tv actress

    पुढील बातम्या