मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Money Laundering प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने नोंदवला जबाब

Money Laundering प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने नोंदवला जबाब

ईडीकडून चारवेळा समन्स बजावल्यानंतर बुधवारी जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाली होती. त्यानंतर शनिवारी, 23 ऑक्टोबरला जॅकलिनने जबाव नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीकडून चारवेळा समन्स बजावल्यानंतर बुधवारी जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाली होती. त्यानंतर शनिवारी, 23 ऑक्टोबरला जॅकलिनने जबाव नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीकडून चारवेळा समन्स बजावल्यानंतर बुधवारी जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाली होती. त्यानंतर शनिवारी, 23 ऑक्टोबरला जॅकलिनने जबाव नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई. 23 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या (Enforcement Directorate- ED) रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. ईडीकडून चारवेळा समन्स बजावल्यानंतर बुधवारी जॅकलिन फर्नांडिस चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाली होती. त्यानंतर शनिवारी, 23 ऑक्टोबरला जॅकलिनने जबाव नोंदवल्याची माहिती जॅकलिनच्या प्रवक्त्याडून देण्यात आली आहे. यापुढे चौकशीसाठी ती ईडीला पुर्णपणे सहकार्य करणार असल्याचे  (Money Laundering  Case)देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणी जॅकलिनचा ई़डीने जॅकलिनचा जबाव नोंदवून घेतला आहे.

ईडीने जॅकलिनला आतापर्यंत चारवेळा समन्स बजावले मात्र चारवेळा देखील ती चौकशीला हजर राहिली नव्हती. त्यानंतर जॅकलीन बुधवारी, 20 ऑक्टोबरला ईडी कार्यलयात दाखल झाली होती. त्यानंतर आज जॅकलिनने जबाव नोंदवलीची माहिती समोर आली आहे. जॅकलीनला ईडीला समन्स पाठवून तिला तीन वर्षाचे बॅंक स्टेटमेंट,डेबिट, क्रेडि कार्ड याचे देखील स्टेटमेंट्सची देखील तिच्याकडून मागणी करण्यात आली होती.

ANI ट्वीट

ANI ट्वीट

25 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर आणि 18 अक्टूबरला जॅकलिनला ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. चार वेळा समन्स बजावूनही जॅकलिन चौकशीसाठी उपस्थित राहिली नाही. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी जॅकलीनची दिल्लीत 6 तास चौकशी करण्यात आली होती. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस यांचे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) जबाब नोंदवला जात आहे. जॅकलीन या प्रकरणात साक्षीदार आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला आहे का नाही याची तपासणी करत आहेत.

दिल्लीच्या रोहिणी कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका व्यापाऱ्याकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्याच्यावर खंडणीचे 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि तो कारागृहाच्या आतून रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.

वाचा, कशा असतात ह्या बायका...तेजश्री प्रधान नव्या भूमिकेत; पाहा VIDEO

जॅकलिन मुळची श्रीलंकेची

जॅकलिन मुळची श्रीलंकेची आहे. मात्र बॉलिवूडने तिला ओळख दिली तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानची ती जवळची मैत्रीण आहे. तिचे वडील श्रीलंकेचे तर आई मलेशियाची आहे. तिचे वडील संगीतकार तर आई एअर होस्टेस होती. चार भांवडात जॅकलीन सर्वात लहान आहे. जॅकलीन एक मोठी बहीण आणि दोन भाऊ आहेत.यापूर्वी अभिनेत्री नोरा फतेही(Nora Fatehi) ईडी (ED)कार्यालयात चौकशीसाठी पोहचली होती. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला दिल्लीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते.

वाचा, VIDEO : माझा होशील ना मालिकेतील आदित्य सध्या करतोय 'हे' काम

कोण आहे सुकेश चंद्रशेखर

मूळचा बेंगळुरू, कर्नाटकातील असलेल्या सुकेश चंद्रशेखरला हाय प्रोफाइल आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सर्व प्रकार केले होते. बेंगळुरू पोलिसांनी जेव्हा सुकेशला पहिल्यांदा अटक केली, तेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून त्याने 1.14 कोटींची फसवणूक केली होती.

First published: