Home /News /entertainment /

सुकेश जॅकलिनच्या असा आला संपर्कात, मग काय सुरू झाला महागड्या भेटवस्तूंचा सिलसिला

सुकेश जॅकलिनच्या असा आला संपर्कात, मग काय सुरू झाला महागड्या भेटवस्तूंचा सिलसिला

सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिसची पहिली भेट कशी झाली आणि त्याने जॅकलिनला काय काय महागड्या भेटवस्तू दिल्या याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

  मुंबई, 13 डिसेंबर: सुकेश चंद्रशेखर प्रकरणी(conman Sukesh Chandrasekhar) एक मोठी बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (Enforcement Directorate) आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिस (Actor Jacqueline Fernandez ) आणि नोरा फतेही यांच्याबाबत मोठा खुलासा झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही अभिनेत्रींनी सुकेशकडून गिफ्ट मिळाल्याची कबुली दिली आहे.सुकेश चंद्रशेखने एका मेकअप आर्टिस्टच्या माध्यमातून जॅकलीन फर्नांडिसने संपर्क साधला होता. सुकेशने जॅकलीन फर्नांडिसचा मेकअप आर्टिस्ट शान मुथिल याला स्पूफिंगद्वारे फोन केला होता. यावेळी त्यानं त्याची ओळख गृह मंत्रालयाचा वरिष्ठ अधिकारी म्हणून सांगितली होती. सुकेशने स्वत:ची ओळख जयललिता यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याची सांगितली होती. यासोबतच स्वत:ला सन टीव्हीचा मालक असल्याचेही त्याने सांगितले होते. पहिल्यांदा जॅकलीनशी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलला  सुकेशने फेब्रुवारी 2021 मध्ये पहिल्यांदा जॅकलीनशी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलला होता. त्यावेळी त्याने वर्ण शेखर रतन वेला अशी त्याची ओळख करून दिली होती. सुकेश जॅकलिनच्या संपर्कात फेब्रुवारी 2021 ते 7 ऑगस्ट 2021 या काळात होता. तोपर्यंत त्याला अटक झाली नव्हती. यादरम्यान सुकेशने जॅकलिनला खूप महागडे गिफ्ट तसेत तिच्या कुटुंबाला पैसे दिले. सुकेशने जॅकलिनसाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्थाही केली होती. जॅकलीन अनेकदा चार्टर्ड फ्लाइटने भारतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली आहे. सुकेशने जॅकलिनच्या सांगण्यावरून एका पटकथा लेखकाला पैसेही दिले होते. वाचा : लग्न झालं असताना देखील या अभिनेत्रीने सलमानला घातली लग्नाची मागणी जॅकलिनने एका वेब सीरिजची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी दिले होते पैसे मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत काला असे या लेखकाचे नाव आहे. ज्याला जॅकलिनने एका वेब सीरिजची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी पैसे दिले होते. जॅकलिनने या लेखकाशी संपर्क साधला होता. बायबलसाठीही या लेखकाला 15 लाख रुपये दिल्याची चर्चा होती. 6 ऑक्टोबर 2021 रोजी, गुरुग्राममधील या लेखकाच्या निवासस्थानी एक माणूस आला. ज्याने स्वतःची ओळख DLF चेअरमनचे सचिव म्हणून दिली आणि काला यास 150000 रुपयांचे पॅकेट दिले. याप्रकरणी अद्वैत कालाचा देखील नोंदवण्याता आला आहे जबाब चौकशीदरम्यान जॅकलिनने तपास यंत्रणेला सांगितले की, ती श्रीलंकेची असून तिचे आई-वडील बहरीनमध्ये राहतात. सुकेश चंद्रशेखर हा गेल्या वर्षी डिसेंबरपासून या वर्षी जानेवारीपासून सतत फोन करून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जॅकलिनने त्याला उत्तर दिले नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने फोन कॉलवर जॅकलिनचा मेकअप आर्टिस्ट शानशी संपर्क साधला आणि स्वत:ला एक मोठा सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले.तसेच तो जयललिता यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले. याशिवाय त्याने स्वतः सन टीव्हीचे मालक असल्याचे सांगितले. सुकेशने सांगितले की, तो जॅकलिनचा खूप मोठा चाहता आहे. सन टीव्हीच्या सहकार्याने जॅकलीनला साऊथसाठी एक चित्रपट करण्याची ऑफरही दिली होती. यानंतर दोघेही संपर्कात आल्याचे जॅकलिनचे म्हणणे आहे. वाचा : बॉलिवूडमधील कपूरनंतर खान कुटुंबातही कोरोना, सलमानची वहिनी पॉझिटिव्ह वॉरन फर्नांडिस यांच्या खात्यात देखील करण्यात आळृले 1500000 रुपयेही ट्रान्सफर यानंतर जॅकलिनने तपास यंत्रणेला सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात तिने सुकेशशी फोनवर संपर्क साधला. त्यानंतर सुकेशने जॅकलिनला दीड लाख डॉलर्सचे कर्ज दिले, जे अमेरिकेत राहणाऱ्या जॅकलिनच्या बहिणीच्या खात्यात ट्रान्सफर झाले. याशिवाय सुकेशने ऑस्ट्रेलियात राहणारा जॅकलिनचा मेहुणा वॉरन फर्नांडिस यांच्या खात्यात 1500000 रुपये ट्रान्सफर केल्याचेही जॅकलिनने सांगितले.जॅकलीनने सांगितले की, सुकेशने तिला एक विदेशी घोडा, तीन डिझायनर बॅग्ज दिल्या ज्या गुच्चीच्या होत्या. ज्यामध्ये काही कपडे होते. याशिवाय लुईसने मिटाउन शूज, दोन डायमंड रिंग, मल्टीस्टोन कानातले, दोन हर्म्स ब्रेसलेट भेट दिले होते, ज्यांची किंमत करोडो रुपये आहे. जॅकलिनला दिली होती मिनी कार भेट याशिवाय जॅकलिनने सांगितले की, सुकेशने तिला मिनी कूपर कार गिफ्ट केली होती. जी तिने नंतर परत केली. याशिवाय सुकेशने जॅकलीनसाठी 15 लाख रुपये रोखही पाठवले होते. पिंकी इराणीची चौकशी केल्यानंतर सुकेशने जॅकलिनच्या मेकअप आर्टिस्टची भेट घेतल्याचेही समोर आले आहे. ही तीच महिला आहे जी सुकेशच्या सांगण्यावरून ब्रँडेड कंपनीच्या शोरूममध्ये जायची आणि तेथून व्हिडिओ कॉलद्वारे जॅकलीनसाठी लाखोंच्या महागड्या गिफ्ट्स विकत घ्यायच्या. ज्या पिंकी विराणीने जॅकलीनच्या मॅनेजरमार्फत तिच्यापर्यंत पोहोचवल्या.
  त्याला जॅकलिनला द्यायची होती bmw कार गिफ्ट नोरा फतेहीच्या चौकशीदरम्यान, सुकेशने नोरा फतेहीला पाच सीरिजची बीएमडब्ल्यू कारही भेट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारची किंमत जवळपास 64 लाख रुपये आहे. नोरा फतेहीच्या सांगण्यावरून सुकेशने मेहबूब खान नावाच्या व्यक्तीच्या नावावर ही कार खरेदी केली आणि नोरा फतेहीला गिफ्ट केली. याशिवाय सुकेश चंद्रशेखरही नोरा फतेहीच्या संपर्कात होता. चौकशीदरम्यान, नोरा फतेहीने लीना मारिया पॉलच्या माध्यमातून चेन्नईतील एका चॅरिटी इव्हेंटमध्येही हजेरी लावल्याचे समोर आले आहे.ज्यासाठी लीना मारिया पॉलने नोरा फतेहीला गुच्ची बॅग आणि आयफोन भेट दिला. यादरम्यान लीना मारिया पॉलने स्पीकर ऑन करून आपल्या पतीला नोरा फतेहीबद्दल बोलायला लावले. तिनं सांगितले की, माझा नवरा तुझा खूप मोठा चाहता आहे. त्याचवेळी हिना मारे ही नोरा फतेहीला म्हणाली, माझ्या नवऱ्याला तुला प्रेमाचे प्रतीक म्हणून बीएमडब्ल्यू कार भेट द्यायची आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Jacqueline fernandez

  पुढील बातम्या