मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रेक्षकांची मनं जिंकायला पुन्हा येतोय प्रोफ्रेसर; या दिवशी रिलीज होणार Money Heistचा 5वा सिझन

प्रेक्षकांची मनं जिंकायला पुन्हा येतोय प्रोफ्रेसर; या दिवशी रिलीज होणार Money Heistचा 5वा सिझन

मनी हाईस्ट (Money Heist) या वेब सीरिजचा पाचवा आणि अंतिम सीझन या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मनी हाईस्ट (Money Heist) या वेब सीरिजचा पाचवा आणि अंतिम सीझन या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मनी हाईस्ट (Money Heist) या वेब सीरिजचा पाचवा आणि अंतिम सीझन या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 01 नोव्हेंबर : प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारी मनी हाईस्ट (Money Heist) ही वेब सीरिज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix)वर रीलिज झालेल्या या मुळच्या स्पॅनिश भाषेतील वेब सीरिजने प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. अगदी भारतातही ही सीरिज टॉप ट्रेंडिंगवर होती. तरुणाईच्या मनात प्रोफेसर आणि इतर सर्वच पात्रांबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. या सीरिजचे 4 सिझन प्रदर्शित झाले आहेत. आता मनी हाईस्टच्या चाहत्यांना पाचव्या सिझनची प्रतीक्षा आहे. प्रोफेसरने सुरू केलेला चोरीचा मामला संपवण्यासाठी तो पुन्हा येणार आहे.

कधी होणार रीलिज?

मनी हाईस्ट या वेब सीरिजच्या पाचव्या भागाची घोषणा झाली असली तरी, प्रेक्षकांना यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.  मनी हाईस्टचा पाचवा सिझन 5 मे 2021 रोजी प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये काम करणाऱ्या प्रोफेसरने म्हणजेच अभिनेता अल्वारो मोर्तेने इन्टाग्रामवर पोस्ट करत मनी हाईस्टच्या रीलिज डेटची घोषणा केली. 'मी येत आहे. प्रोफेसर परत आला आहे'. असं कॅप्शन देत अल्वारो मोर्तेने ही घोषणा केली. चोरीचा सर्वात मोठा प्लान करुन पूर्णत्वास कसा नेला जातो. त्यात या चोरांना कशाप्रकारच्या अडचणी येतात. कमी दिवसात भरपूर पैसे कमवण्यासाठी प्रोफेसरने आखलेला मास्टर प्लान आणि त्याला त्यांच्या टीमची साथ अशी काहीशी सुरुवात पहिल्या सिझनमध्ये झाली होती. मनी हाईस्टचा चौथा सिझन अतिशय उत्कंठावर्धक टप्प्यावर येऊन थांबला होता. त्यामुळे चाहते या सीरिजच्या रीलिजची वाट पाहात आहेत.

View this post on Instagram

It looks like we are coming to an end... #lcdp5 💥💥💥💥💥💥

A post shared by Álvaro Morte (@alvaromorte) on

भारतामध्येही या सीरिजला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. वेगवेगळ्या शहरांची नावं वापरुन चोऱ्या करणारे चोर आणि त्यांचा प्रोफेसर हे सगळंच पडद्यावर पाहायला तरुणाईला फारच आवडलं होतं.

First published: