मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'ड्राय डे' फेम मोनालीसा बागलचा 'जीव झाला बाजिंद' आपल्या भेटीला; चाहत्यांकडून होतंय कौतुक

'ड्राय डे' फेम मोनालीसा बागलचा 'जीव झाला बाजिंद' आपल्या भेटीला; चाहत्यांकडून होतंय कौतुक

'ड्राय डे' (Dry Day) आणि 'करंट' सारख्या चित्रपटांतुन आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा बगल(Monalisa Bagal) होय.

'ड्राय डे' (Dry Day) आणि 'करंट' सारख्या चित्रपटांतुन आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा बगल(Monalisa Bagal) होय.

'ड्राय डे' (Dry Day) आणि 'करंट' सारख्या चित्रपटांतुन आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा बगल(Monalisa Bagal) होय.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10ऑक्टोबर- 'ड्राय डे' (Dry Day) आणि 'करंट' सारख्या चित्रपटांतुन आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा बगल(Monalisa Bagal) होय. आपल्या गोड चेहऱ्याने आणि सुंदर अभिनयाने या अभिनेत्रीने आपला एक विशेष चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्यामुळेच तुम्हाला सांगू इच्छितो, मोनालिसा बागल नुकताच एका नव्या व्हिडीओ अल्बममधून आपल्या भेटीला आली आहे. 'जीव झाला बाजिंद' असं या गाण्याचं नाव आहे. यामध्ये ती अभिनेता विठ्ठल काळेसोबत (Vitthal Kale) दिसून येत आहे.

" isDesktop="true" id="615982" >

आतापर्यंत मोनालिसाने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यामुळे तिच्या अभिनयातला वेगळेपणा सर्वानांच दिसून आला आहे. तिची मेहनत प्रेक्षकांना दिसली आणि म्हणूनच प्रेक्षक तिला पसंती दर्शवतात. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या गाण्यातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. नेहमी पेक्षा वेगळ्या धाटणीचं, गावरान बाज असलेल्या 'जीव झाला बाजिंद' या गोड आणि नव्या गाण्यात मोनालिसा बागल दिसणार आहे. गावाकडची प्रेम कथा सांगणाऱ्या या गाण्यात मोनालिसा सोबत अभिनेता विठ्ठल काळे झळकणार आहेत. हे गाणं एक वेगळा अनुभव नक्कीच देऊन जाईल पण या गाण्याच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन जोडी दिसणार आहे. विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल असा विश्वास गाण्याचे दिग्दर्शक शुभम गोणेकर यांनी व्यक्त केला आहे.

(हे वाचा:'जीव माझा गुंतला' फेम अंतराचा ग्लॅमरस अंदाज;तुम्ही पाहिला का अभिनेत्रीचा हा लुक)

८ ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिले असून मयूर सुकाळे यांनी गाणं गायलं आहे. तर संकेत शिर्के यांनी संगीत दिलं आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे. एकूणच गावाकडचे वातावरण, दोन कलाकारांमधील केमिस्ट्री, गाणं, आवाज-संगीत आणि शब्द या सगळयाने तुम्हा सर्वांचा जीव बाजिंद होणार आहे हे नक्की. 'जीव झाला बाजिंद' हे गाणं

First published:

Tags: Marathi entertainment