मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आता काय बोलायचं? कोरोना जगभरात उच्छाद मांडत असताना या अभिनेत्रीला मात्र आठवली बिअर

आता काय बोलायचं? कोरोना जगभरात उच्छाद मांडत असताना या अभिनेत्रीला मात्र आठवली बिअर

कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात उच्छाद मांडत असताना, 'मोहब्बते' फेम या अभिनेत्रीला मात्र बिअरची आठवण झाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 16 मार्च : 2020 या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यातच कोरोना व्हायरसने (Coronavirus) माणसाला ग्रासलं आहे. अशातच संपूर्ण वर्ष कसं जाणार याची चिंता सर्वांना भेडसावत आहे. भारतामध्ये देखील कोरोनाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. पण सोशल मीडियावर केले जाणारे विनोद तसंच मीम्स या गंभीर परिस्थितीमध्ये हसवण्याचं काम करतात. असाच एक विनोद 'मोहब्बते' फेम अभिनेत्री किम शर्मा हिने केला आहे, मात्र त्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
View this post on Instagram

🍏

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किम शर्माने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिला कोरोनावरून बिअरची आठवण झाली आहे. अभिनेत्री किमने इन्स्टाग्रावर एक पोस्ट करून काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोमध्ये तिच्याबरोबर अभिनेत्री प्रीती झांगियानीला देखील पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने असं कॅप्शन दिलं आहे की, 'हा बँकॉकमधील एका रात्रीचा थ्रोबॅक फोटो, त्यावेळी आम्ही तरूण आणि बेफिकीर होतो आणि त्यावेळी कोरोनाचा अर्थ केवळ फॅन्सी बिअर एवढाच होता.' तिच्या या कॅप्शनवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना तिच्या कॅप्शनमधील उपहासात्मकता आवडली आहे. तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram

#throwback to a night in Bangkok, when we were young and carefree and corona meant a fancy beer 🍺 #tbt @jhangianipreeti 👯‍♂️

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

दरम्यान तिच्या या फोटोवर प्रितीने देखील कमेंट केली आहे. त्या दोघींचा हा जुना फोटो असल्यामुळे त्यांच्या फॅन्सना एकदम मोहब्बतेंची आठवण झाली आहे.
First published:

Tags: Corona virus in india, Kim sharma

पुढील बातम्या