'मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

'मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित 'मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर 'एरॉस नाउ'नं रिलीज केला.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' पाठोपाठ त्यांच्यावर बनत असलेली वेब सीरिज 'मोदी- जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर 'एरॉस नाउ'नं रिलीज केला. ही वेब सीरीज एकूण 10 भागात दाखवण्यात येणार असून यात नरेंद्र मोदी यांच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा समावेश करण्यात येणार आहे. एक सामान्य कुटूंबातील मुलगा ते देशाचे पंतप्रधान असा मोदींचा प्रवास या वेब सीरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली कविता 'मोदी- द जर्नी ऑफ अ कॉमन मॅन'मध्ये वापरण्यात आली आहे. या सीरिजचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी म्हटलं की, 'जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींचा अभ्यास करत होतो, तेव्हा आम्हाला त्यांनी लिहिलेल्या कविता मिळाल्या. या कवितांचा वापर सीरिजमध्ये नक्की करता येईल, असं आम्हाला वाटलं आणि आम्ही त्यांची 'श्याम के रोगन रेले' ही कविता या वेब सीरीजमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला.'

'मोदी- द जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' ही वेब सीरीज '102 नॉट आऊट'चे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केली असून अभिनेता महेश ठाकूर यात नरेंद्र मोदींची मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. मात्र मोदींच्या वेगवेगळ्या वयातील भूमिका फैसल खान आणि आशिष शर्मा साकारणार आहे. याशिवाय दर्शन जरीवाला आणि मकरंद देशपांडे यांच्याही या सीरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. मूळ सीरिज मिहिर भूता आणि राधिका आनंद यांनी लिहिली आहे. प्रत्येक भाग हा ३५ ते ४० मिनिटांचा असून ही वेब सीरीज एप्रिल महिन्यात एरॉस नाउवर पाहता येणार आहे.

पाहा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही पाहिलं नाही का? येथे पाहा UNCUT

वाचा : काय आहे भारताचं 'मिशन शक्ती'? जाणून घ्या या पराक्रमाचे महत्त्व

वाचा : ऐश्वर्या नारकर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, झी नाट्य गौरवचे रंगतदार PHOTOS व्हायरल

First published: March 27, 2019, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading