मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फरहान अख्तरशी लग्नं करणार शिबानी दांडेकर? अफेअरवर बोलताना म्हणाली...

फरहान अख्तरशी लग्नं करणार शिबानी दांडेकर? अफेअरवर बोलताना म्हणाली...

शिबानी दांडेकरने मुलाखतीत तिच्या आणि फरहानच्या नात्याविषयी सांगितलं आहे. तसेच लग्नविषयी देखील बोलली आहे.

शिबानी दांडेकरने मुलाखतीत तिच्या आणि फरहानच्या नात्याविषयी सांगितलं आहे. तसेच लग्नविषयी देखील बोलली आहे.

शिबानी दांडेकरने मुलाखतीत तिच्या आणि फरहानच्या नात्याविषयी सांगितलं आहे. तसेच लग्नविषयी देखील बोलली आहे.

मुंबई 3 ऑगस्ट : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांचं नातं आता जगापासून लपून नाही. अनेकदा त्यांनी यावर मोहर लावली आहे. शिबानी आणि फरहान अनेकदा एकत्र फोटो ही शेअर करतात. मागील 3 वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते राहत आहेत. मागील वर्षी ते मालदीव (Maldive) व्हेकेशनवर देखील गेले होते.

दरम्यान फरहानच यापूर्वी लग्न झालं होतं. अधूना भवानी (Adhuna Bhavani) हिच्याशी त्याने लग्न केलं होतं. पण लग्नाच्या 17 वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुलंही आहेत. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शिबानीने तिच्या आणि फरहानच्या लग्नाविषयी सांगीतल आहे.

Shocking! हनी सिंगच्या पत्नीची कोर्टात धाव; घरगुती हिंसाचाराचे केले आरोप

शिबानीने सांगीतल की, लॉकडाऊन दरम्यान त्यांना एकमेकांना ओळखण्यास वेळ मिळाला. यामुळेच ते पहिल्यापेक्षा ही एकमेकांच्या जास्त जवळचे झाले आहेत. अनेकदा ते एकत्र ही दिसतात ते वेळ घालवतात. (Farhan Akhtar- Shibani Dandekar Wedding)

तब्बल महिन्याभरानंतर मंदिराने शेअर केला हसमुख फोटो; म्हणाली...

पुढे ती म्हणाली, “प्रत्येकजण मला माझ्या आणि फरहानच्या लग्नाविषयी विचारत आहे. पण अजून आमच्यात हा प्रश्न आला नाही. मी सगळ्यांना हेच सांगते की, विचार करून सांगेन.” बॉडींग विषयी बोलताना ती म्हणाली, “आम्ही एकत्र वर्कआऊट करतो, चित्रपट पाहतो, एन्जॉय करतो.”

लग्नाच्या 17 वर्षांनंतर फरहान आपल्या पत्नीपासून वेगळा झाला होतं त्यानंतर त्याचं नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरशी जोडलं जात होतं. मात्र नंतर तो शिबानी सोबत रिलेशनशीपमध्ये आला. तर त्याची पूर्व पत्नी अधुना घटस्फोटानंतर निकोलो मोरयाला डेट करत आहे. तो दिनो मोरयाचा भाऊ आहे. अधूना एक प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट (Hair Stylist) आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Farhan akhtar