मुंबई, 12 डिसेंबर: वयाच्या 55 व्या वर्षीही मिलिंद सोमणचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. त्याच्या मॉडेलिंग आणि अभिनयापेक्षा तो फिटनेसमुळेच जास्त चर्चेत असतो. मिलिंद सोमण (Milind Soman) नुकताच ईशान्येकडील राज्यात फिरायला गेला होता. तिथे ट्रेकिंगदरम्यान त्याने अनेक सुंदर अनुभव घेतले. तिथल्या फालूत नावाच्या एका डोंगरावर त्याने योगासनही केली. तिथला योगाभ्यास करतानाचा मिलिंद सोमणचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो शिर्षासन करताना दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल माऊंटन डेच्या ( International Mountain Day) निमित्ताने मिलिंदने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याच्या फोटोंना आत्तापर्यंत 3 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत. फालूत ही जागा समुद्रसपाटीपासून 12000 फूट उंचीवर आहे. तिथलं तापमान 4 अंश सेल्सियस एवढं आहे. हा परिसर पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या बॉर्डरजवळ आहे.
मिलिंद सोमण सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. पौरषपूर या नव्या वेब सीरिजमध्ये मिलिंद सोमण झळकणार आहे. त्यामधील त्याच्या भूमिकेबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. या सीरिजचं विशेष आकर्षण ठरतोय तो मिलिंद सोमणचा किलर लूक. नोजरिंग, धोतर, लांब केस, हातात तलवार, कपाळाला कुंकू या लूकवर त्याचे चाहते फिदा झाले आहे. अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) या सीरिजमध्ये बोरीस हे पात्र साकारत आहे. बोरीस हा एक ट्रान्सजेंडर दाखवण्यात आला आहे. ज्याला महिलांना मिळणाऱ्या असमान वागणुकीबद्दल चीड असते. काही दिवसांपूर्वी तो एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आला होता.