टाइट ड्रेसमुळे बेशुद्ध झाली ही मॉडेल

टाइट ड्रेसमुळे बेशुद्ध झाली ही मॉडेल

तिने शुद्ध हरपण्याचं कारण पाळी असल्याचं सांगितलं. तसेच पाळीच्या काळात वाढलेल्या वजनाला तिने दोष दिला.

  • Share this:

रँपवर चालणाऱ्या मॉडेलकडे साऱ्यांचंच लक्ष असतं. त्यांची फिगर पाहून अनेकांना वाटतं की त्यांच्यासारखी फिगर आपलीही असावी. पण फार कमी लोकांना माहीत आहे की अशी फिगर कमावण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात हे फार कमी लोकांना माहीत आहे. डाएटिंग, वर्कआउटशिवाय मॉडेल कधी कधी त्यांच्या विचित्र कपड्यांमुळेही बेशुद्ध होतात. नुकतंच असं मॉडेल एली फॅनिंगसोबत झालं.

सोमवारी २३ मे रोजी कान महोत्सवातील ही घटना आहे. एका मॉडेलने गरजेपेक्षा जास्त टाइट ड्रेस घातला होता. यामुळे चक्क ती बेशुद्ध पडली. एलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर घडलेली घडना सांगितली. एली म्हणाली की, ‘आज मी 1950 Prada Prom ड्रेस घालून बेशुद्ध झाले. पण आता सगळं ठीक आहे.’ या पोस्टसह तिने #DressTooTight आणि #TimeOfTheMonth असे हॅशटॅग दिले. त्या काळात तिला पाळी आली होती.

एलीच्या या पोस्टवर जमीलाने फॅशन इंडस्ट्रीवर फार कठोर कमेंट केली. तिने ट्विटरवर लिहिले की, ‘देवा, सडपातळ अभिनेत्री एली फॅनिंगची टाइट ड्रेसमुळे शुद्ध हरपली. तिने शुद्ध हरपण्याचं कारण पाळी असल्याचं सांगितलं पण सँपल साइजचा ड्रेस ही फार वैताग आणणारी गोष्ट आहे. पाळीच्या काळात वाढलेल्या वजनाला दोष देणं चुकीचं आहे. त्याउलट टाइट ड्रेस घालायला देण्यावर आक्षेप घेतला पाहिजे.’

VIDEO: सुरतमधील भीषण आग प्रकरण, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

Tags:
First Published: May 25, 2019 09:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading