मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सेल्फीच्या नादात मॉडेलने गमावला जीव; एका फोटोसाठी घ्यायची मोठी जोखीम

सेल्फीच्या नादात मॉडेलने गमावला जीव; एका फोटोसाठी घ्यायची मोठी जोखीम

सोफिया नेहमीच मोठी जोखीम घेऊन फोटो घ्यायची. तिच्या फोटोंना चांगले लाइक्सही मिळायचे.

सोफिया नेहमीच मोठी जोखीम घेऊन फोटो घ्यायची. तिच्या फोटोंना चांगले लाइक्सही मिळायचे.

सोफिया नेहमीच मोठी जोखीम घेऊन फोटो घ्यायची. तिच्या फोटोंना चांगले लाइक्सही मिळायचे.

  • Published by:  News Digital
मुंबई 15 जुलै : सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे फोटो पाहायला मिळतात. त्यात मॉडेल्सचे फोटो (Models photos) विशेष लोकप्रिय ठरतात. तर अनेक मॉडेल्स फोटोंसाठी विशेष मेहनत घेताना दिसतात. पण याच फोटोंच्या मोहामुळे एका मॉडेलने आपला जीव गमावला आहे. हाँगकाँगमध्ये राहणारी मॉडेल सोफिया चेउंगचा (Sophia Cheung) असाच एक फोटो काढताना तिला प्राण गमवावे लागले आहे. 32 वर्षीय सोफिया सोशल मीडियावर फार सक्रिय असायची. तिच्या फोटोंना चागंले लाइक्स आणि कमेंट्सही मिळायचे. ती आपल्या मित्रमैत्रीणींसोबत हा पाक लाई पार्क या ठिकाणी ट्रेकींगसाठी गेली होती. पण तिथेच तिचा मृत्यु झाला आहे.

OMG! 80 लाखांची बॅग घेऊन फिरतेय आदर पूनावलांची पत्नी; प्रियंकासोबत आहे खास मैत्री

काही वृत्तांनुसार सोफिया चेउंग त्सिंग दाई स्ट्रीम ( Tsing Dai stream) येथे किनाऱ्यावर फोटो काढण्यासाठी पोझ देत होती. तेव्हाच तिचा तोल गेला आणि ती ५ मीटर खोल पुलात कोसळली. त्यानंतर तिच्या मित्रांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे तिला मृत घोषीत करण्यात आलं.
सोफिया ही आगळीवेगळी आणि खतरनाक सेल्फी घेण्यासाठी प्रसिद्ध होती. तिचे फोटो लक्षवेधी असायचे. सोफियाचं सोशल मीडिया अकाउंट पाहिलं तर तिचे अनेक फोटो हे अतिशय खतरनाक पद्धतीने घेतलेले आहेत. तिला असे फोटो काढण्याचा छंद होता. (Model die while taking selfie)
सोशल मीडियावर लोक आता सोफियाला श्रद्धांजली वाहत आहेत. शनिवारी तिने शेवटचा फोटो शेअर केला होता. ज्यात तिने लिहीलं होतं, ‘चांगले दिवस येत आहेत, ज्याला शनिवार आणि रविवार म्हणतात.’
First published:

Tags: Entertainment, Model

पुढील बातम्या