Home /News /entertainment /

OMG! अभिनेत्रीची लहानशी पर्स कारपेक्षाही आहे महाग; किंमत ऐकून बसेल धक्का

OMG! अभिनेत्रीची लहानशी पर्स कारपेक्षाही आहे महाग; किंमत ऐकून बसेल धक्का

अभिनेत्री सोनल चौहानच्या हातातली ही लहानशी बॅग अतिशय महागडी आहे. किमंत वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

  मुंबई 25 जून : अभिनेत्री आणि त्यांचे महागडे लूक्स, (expensive looks) महागड्या वस्तू यात काहीच नवीन नाही. अनेकदा बॉलीवूड (Bollywood) असो किंवा हॉलिवूड या स्टार्सचे अनेक एक्सपेन्सिव्ह गोष्टी पाहायला मिळतात. आताही अभिनेत्री सोनाल चौहान (Sonal Chauhan) च्या हातात एक महागडी पर्स पाहायला मिळत आहे. सोनलच्या हातातील ही पर्स एखाद्या मोठ्या गाडी इतकीच महाग आहे. सोनल मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यावेळी तिच्या हातात ही महागडी पर्सही होती. लाल रंगाची ही लहानशी पर्स एका मोठ्या ब्रँड ची आहे. ब्रँडच्या बॅग्स या लाखोंच्या किमती पासूनच सुरू होतात.

  ग्लॅमरस उर्वशीने पारंपरिक वेशात पुन्हा वेधलं लक्ष; चाहते म्हणाले 'नजर हटवण कठीण'

  सोनलच्या हातातील या पर्सची किंमत या ब्रँडच्या साईट नुसार 8500$ पेक्षाही जास्त आहे. म्हणजेच भारतीय चलना नुसार जवळपास 6.3 लाखांच्या वर. (Sonal Chauhan expensive bag)
  View this post on Instagram

  A post shared by Voompla (@voompla)

  सोनल मुंबई एअरपोर्ट वरून जात असताना paparazzi ने तिला स्पॉट केलं होतं. सोनल सध्या चित्रपटांत जास्त दिसत नाही मात्र सोशल मीडिया वर ती फार सक्रिय असते. तिचे नवनवीन लुक्स नेहमीच साऱ्यांच लक्ष वेधतात.
  अभिनेता इम्रान हाश्मी सोबत ‘जन्नत’ (Jannat) चित्रपटातून सोनलने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातून तिला मोठी ओळखही मिळाली होती. त्याधी सोनल ‘मिस वर्ल्ड ट्युरिझम’ ठरली होती. पण नंतर मात्र सोनल जास्त चित्रपटांत झळकली नाही. याआधीही अनेक सेलिब्रिटींच्या महागड्या वस्तू पाहायला मिळाल्या होत्या. नुकतीच अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीची महागडी बॅग पहायला मिळाली होती. तर तिची किंमतही 5 लाखांच्यावर होती. याशिवाय अभिनेत्री उर्वशी रौतेला, प्रियंका चोप्रा, जान्हवी कपूर यांच्याकडेही अनेक महागड्या वस्तू पाहायला मिळाल्या होत्या.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या