मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार, Mission Mangal चं यू-टर्न

मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार, Mission Mangal चं यू-टर्न

मनसेचा आक्रमक पवित्रा पाहता अवघ्या दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतली.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट- अभिनेता अक्षय कुमारचा मिशन मंगल हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा डब करून मराठीत प्रदर्शित करण्याची घोषणा शुक्रवारी केली गेली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हमधून या निर्णयाला विरोध केला. मनसेचा आक्रमक पवित्रा पाहता अवघ्या दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतली. हिंदी सिनेमा मराठीत डब करण्यावर आपली प्रतिक्रिया देताना खोपकर म्हणाले की, 'मराठी सिनेमांना चित्रपटगृह मिळवण्यासाठी आतापर्यंत आंदोलन करत आलो. आता तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. १५ आॅगस्टला अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हा सिनेमा देशभरात हिंदीत प्रदर्शित होत आहे. तो महाराष्ट्रात हिंदीसह मराठीतही प्रदर्शित होणार आहे.'

'हिंदी भाषेतील 'मिशन मंगल' सिनेमाला आमचा विरोध नाही. पण मराठीत डब करण्यामागं फार मोठं षडयंत्र आहे. इतर भाषेतील सिनेमे मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेमांनी काय करायचं असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात येत्या काही दिवसांत मोठं आंदोलन उभं करेल. सरकारनं यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील.'

एवढं बोलून अमेय खोपकर थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, 'चित्रपटगृहांच्या मालकांनाही ते परवडणार नाही.'मिशन मंगल' हा चित्रपट मराठीत डब करण्यापेक्षा कलाकारांसोबत रिशूट करा. त्याला आमचा विरोध नाही. आमचा केवळ मराठीत डब करून रिलीज करायला विरोध आहे. जर 'मिशन मंगल' मराठीत डब करून हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला, तर हिंदी चित्रपटही रिलीज होऊ देणार नाही,' खोपकर यांनी 'मिशन मंगल' मराठीत डब करून प्रदर्शित करण्याला विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमार आणि सिनेमाच्या टीमने आपला निर्णय बदलला. मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित होणार नसल्याचे टीमने जाहीर केले.

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

First published: August 3, 2019, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading