'मराठी चित्रपटाला प्राईम टाइम द्या, अन्यथा खळखट्याक'; मनसेचा इशारा

'मराठी चित्रपटाला प्राईम टाइम द्या, अन्यथा खळखट्याक'; मनसेचा इशारा

मराठी चित्रपटाला प्राईम टाइम न मिळाल्यास खळखट्याक करू, असा इशारा मनसेनं थिएटर मालकांना दिला आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे, 23 ऑक्टोबर : मराठी चित्रपटांना थिएटर नाकारल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रिपल सीट आणि हिरकणी या मराठी चित्रपटाला थिएटर मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीने पुण्यातील किबे लक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर आंदोलन करण्यात आलं आहे. तसंच मराठी चित्रपटाला प्राईम टाइम न मिळाल्यास खळखट्याक करू, असा इशारा मनसेनं थिएटर मालकांना दिला आहे.

मराठी चित्रपटावर अन्याय करून हिंदी चित्रपटाला मल्टीप्लेक्समध्ये प्राईम शो दिले जातात, असा आरोप करत मनसेनं पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात ट्रिपलसीट आणि हिरकणी हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याच सुमारास हाऊसफुल हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

थिएटर मालकांनी मराठी चित्रपटांना डावलून हिंदी चित्रपटाला स्थान देऊ नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आक्रमक झाली आहे. यासाठी पुण्यातील किबे लक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर अभिनेता रमेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, याआधीही मनसेनं मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून अनेकदा आंदोलन केलं आहे. काही वेळा तर मनसेनं आक्रमक भूमिका घेत थिएटर मालकांनाही लक्ष्य केलं आहे. त्यामुळे आता मनसेच्या आंदोलनानंतर थिएटर मालक काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

Published by: Akshay Shitole
First published: October 23, 2019, 1:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading