करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

जर ही एक ड्रग पार्टी नव्हती तर तिकडे खाण्या- पिण्याचे पदार्थ का नव्हते? जर तिकडे ड्रग नव्हते तर सगळे नशेत धुंद का दिसत होते?

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट- अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी शुक्रवारी बॉलिवूडला एक खुलं पत्र लिहिलं. यात त्यांनी देशाच्या जनतेचा विश्वास तोडल्याबद्दल बॉलिवूड तारकांनी देशाची माफी मागण्याचं साहस दाखवावं असं स्पष्ट लिहिलं. निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर एका 'ड्र पार्टी'चा व्हिडिओ शेअर केला होता. यात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि विकी कौशलसह बॉलिवूडमधील अनेक स्टार नशेत असल्यासारखे वाटत होते.

सिरसा यांनी ट्वीट करत बॉलिवूडला खुलं पत्र लिहिलं. हे पत्र सर्वांनी वाचावं आणि इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून बॉलिवूड स्टार्सना टॅग करत शेअर करण्याचा आग्रह करत आहे. आपण त्यांच्यासोबत हॅशटॅग फॅन मुमेंट शेअर केला. पण आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्यांनी पत्रात पुढे लिहिले की, जर सचिन तेंडुलकरला आपल्या देशात पूजलं जात असेल तर रजनीकांतला पूजणारेही लाखो आहेत. फॅन बॉइज आणि फॅन गर्ल्सच्या या जगात, बॉलिवूडचे सेलिब्रिटी राष्ट्रीय प्लॅटफॉर्मसह सोशल मीडियावरही चाहत्यांचं अपार प्रेम आणि समर्थन घेत असतात.

त्यांनी पुढे लिहिले की, राष्ट्रीय उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये तुम्हाला नेहमी पहिल्या रांगेत स्थान मिळतं. परदेशात तुमच्यासोबत अनधिकृत राजदूताप्रमाणे व्यवहार केला जातो. हेअरकट, पोशाखची उंची आणि मुलांच्या नामकरणामध्ये तर तुम्ही ट्रेण्डसेटर आहात. अशावेळी उत्तर देण्याचं टाळत ही आमची वैयक्तिक गोष्ट असल्याचं म्हणता हे योग्य आहे का? हे कमी की काय इन्स्टाग्रामवर 'ड्रग पार्टी'चा दिखावाही करता?

त्यांनी आपलं मत मांडत पुढे लिहिले की, जर ही एक ड्रग पार्टी नव्हती तर तिकडे खाण्या- पिण्याचे पदार्थ का नव्हते? जर तिकडे ड्रग नव्हते तर सगळे नशेत धुंद का दिसत होते? 'उडता पंजाब' सिनेमाचा संदर्भ देत सिरसा म्हणाले की, ड्रग आणि मादक पदार्थांना फक्त ऑन स्क्रीन नापसंती आणि एका राज्याला बदनाम करण्यापर्यंतच मर्यादित असतं का? 'उडता पंजाब' सिनेमातील कलाकार शाहिद कपूरही त्या पार्टीत उपस्थित होता. म्हणूनच सिरसा यांनी पार्टीवर निशाणा साधत हॅशटॅग 'उडता बॉलिवूड' असं म्हटलं. त्यांनी पत्रात लिहिले की, माझ्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्यांकडून मी आशा करतो की बॉलिवूडकरांनी सॉरी म्हणण्याची हिंमत दाखवावी.

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 12:09 PM IST

ताज्या बातम्या