Home /News /entertainment /

मिथुन चक्रवर्तींच्या सूनबाईंचा डान्सचा जलवा; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, 'ओ..ना..ना..'

मिथुन चक्रवर्तींच्या सूनबाईंचा डान्सचा जलवा; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, 'ओ..ना..ना..'

बॉलिवूडचे ग्रेट डान्सर मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची सून मदालसा शर्मादेखील (Madalsa Sharma) भन्नाट डान्सर आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

मुंबई, 04 जानेवारी : बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची सून आणि अभिनेत्री मदालसा शर्मा (Madalsa Sharma) अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असते. मदालसा हिने दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय  असते. आपल्या चाहत्यांसाठी ती विविध फोटो आणि व्हिडीओ नेहमी अपलोड करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका गाण्यावर डान्स करताना दिसून येत असून हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. मदालसा हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती 'ओ ना ना' या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडिओत डान्स करताना ती खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे. यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे 2 लाख फॉलोअर्स असून विविध व्हिडीओ आणि फोटो टाकून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमो चक्रवर्ती (mimo Chakraborty) याच्याशी तिने विवाह केला असून मिमो देखील बॉलिवूडमध्ये काम करतो. त्याने विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या असून सध्या मात्र त्याच्याकडे कोणताही चित्रपट नाही.
दरम्यान, मदालसा हिने बॉलिवूड पेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त काम केलं असून सध्या ती  टेलिव्हिजनवरील अनुपमा या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती निगेटिव्ह भूमिका करत असून तिची भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळे अनेक जण तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. तिचे फोटो आणि व्हिडिओ कधी अपलोड होतात याचीच वाट अनेक नेटकरी पाहत असतात. बॉलिवूडमध्ये तिने सम्राट अँड कंपनी आणि दिल साला सनकी या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. एंजल या चित्रपटातून तिने आपला बॉलिवूड डेब्यू केला होता.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Bollywood News, Video viral

पुढील बातम्या