'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरच कोसळले मिथुन चक्रवर्ती

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरच कोसळले मिथुन चक्रवर्ती

चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच मिथुनदांची (Mithun Chakraborty) तब्येत एकदम खालावली. मसूरीमध्ये द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी त्यांची तब्येत अचानक खालावली. मसूरीमध्ये आऊटडोअर शूटिंग सुरू असताना ते सेटवरच कोसळले. त्यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाचं शूटिंग थांबवलं आहे. या चित्रपटामध्ये मिथुन दा महत्वाची भूमिका साकारत आहेत.

फूड पॉयझनिंगमुळे त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी ही सगळी घटना घडली. निर्माते आणि सेटवरील सर्वांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये यासाठी मिथुन चक्रवर्ती आजारी असतानाही शूटिंग सुरू करा असं म्हणत होते. पण दिग्दर्शकांनी त्यांना आराम करण्याची विनंती केली. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री स्वत: ही माहिती देतात.

कोणाच्या प्रमुख भूमिका?

द काश्मीर फाइल्स या चित्रपटामध्ये मिथून चक्रवर्तींसोबतच अनुपम खेर, पुनित इस्सार यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. किसान आंदोलनादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. 1990 साली काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार, हत्याकांडांची कहाणी यात दाखवण्यात येणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 21, 2020, 12:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या