मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Tatto काढताना भीती नाही वाटली...' Vaccine ला घाबरणारी मिताली मयेकर झाली ट्रोल

'Tatto काढताना भीती नाही वाटली...' Vaccine ला घाबरणारी मिताली मयेकर झाली ट्रोल

मिताली मयेकर मराठीमधील एक सुंदर आणि डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मितालीने 'उर्फी' सारख्या मराठी चित्रपटात काम केलं आहे. तर 'फ्रेशर्स' सारख्या कॉलेजलाईफवर आधारित तरुणाईच मन जिंकलं आहे.

मिताली मयेकर मराठीमधील एक सुंदर आणि डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मितालीने 'उर्फी' सारख्या मराठी चित्रपटात काम केलं आहे. तर 'फ्रेशर्स' सारख्या कॉलेजलाईफवर आधारित तरुणाईच मन जिंकलं आहे.

मिताली मयेकर मराठीमधील एक सुंदर आणि डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मितालीने 'उर्फी' सारख्या मराठी चित्रपटात काम केलं आहे. तर 'फ्रेशर्स' सारख्या कॉलेजलाईफवर आधारित तरुणाईच मन जिंकलं आहे.

मुंबई, 30सप्टेंबर- मराठी अभिनेत्री(Marathi Actress) मिताली मयेकरने(Mitali Mayekar) नुकताच कोरोना लशीचा (Vaccine) पहिला डोस घेतला आहे. त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ शेअर करताच अभिनेत्री मोठया प्रमाणात ट्रोल होत आहे. पाहूया नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये.

कलाकारांचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना पसंत पडत असतो. चाहते नेहमीच कलाकाराच्या प्रत्येक अंदाजाची वाहवाह करत असतात. मात्र अनेकवेळ हे कलाकार ट्रोलसुद्धा केले जातात. असच काहीसं आलं आहे. मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरसोबत मिताली मयेकर एक डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र तिच्या या व्हिडीओवरून चाहते तिची खिल्ली उडवत आहेत. अभिनेत्री मिताली मयेकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती कोरोनाचा लशीचा पहिला डोस घेत आहे. मात्र लस घेताना ती थोडं जास्तचं घाबरत आहे. या व्हिडीओमध्ये इंजेक्शनला पाहून मिताली जास्तच अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे.

(हे वाचा:VIDEO:हृता दुर्गुळेने स्टार्ट केली ट्रान्सफॉर्मेशन जर्नी; अभिनेत्री अशी घेतेय...)

हा व्हिडीओ पाहून युजर्स मितालीला ट्रोल करू लागले आहेत. ट्रोलर्स म्हटण आहेत, इतके टॅटू काढून घेतलेस तेव्हा भीती नाही का वाटली आता इतक्या साध्या इंजेक्शनला घाबरत आहेस. एका युजर्सने कमेंट करत म्हटलं आहे, 'सो मच ओव्हरऍक्टिंग', तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे, 'इतके टॅटू काढलेस तेव्हा भीती वाटली नाही का?', तर आणखी एकाने म्हटलं आहे, 'तू टॅटू बनवले आहेस, लस तर एक छोटी गोष्ट आहे'. तर आणखी एका युजरने 'ओव्हरऍक्टिंग' असं म्हटलं आहे. अशा पद्धतीने मितालीच्या या व्हिडीओवरून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत.

(हे वाचा:दे धक्का 2:अखेर तारीख ठरली! या दिवशी चित्रपट येणार भेटीला)

मिताली मयेकर मराठीमधील एक सुंदर आणि डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मितालीने 'उर्फी' सारख्या मराठी चित्रपटात काम केलं आहे. तर 'फ्रेशर्स' सारख्या कॉलेजलाईफवर आधारित तरुणाईच मन जिंकलं आहे. मिताली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि रिल्स शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. मिताली आणि सिद्धार्थची जोडीही सोशल मीडियावर प्रचंड पसंत केली जाते. या दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केलं आहे. हे सतत आपले रोमॅंटिक फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment