• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO

मिताली मयेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; पाहा VIDEO

अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी. त्या दोघांच्या घरात कुठल्या पाहुण्याचं आगमन होतंय पाहा

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर 2021 ; अभिनेत्री मिताली मयेकर  (Mitali Mayekar) आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आज देखील मितालीने सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने 'अतिथि देवो भव' असे म्हटले आहे. यावरून तुमच्या लक्षात आले देखील असेल की, मिताली आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Mitali Mayekar Latest Photo)  यांच्या घरी एका नव्या पाहु्ण्याचे आगमन झाले आहे. मितालीने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मितालीच्या घरी नविन पाहुणे मंडळी म्हणजे माकड आल्याचे दिसत आहे. तिच्या घरातील खिडकीवर माकड आल्याचे दिसत आहे. मितालीने यांचा चांगलाच पाहुणचार केलेला दिसत आहे. मितालीने या माकडांना ग्लासनी पाणी पाजले आहे. तसेच खाण्यासाठी सफरचंद देखील दिले आहे. मितालीच्या या व्हिडिओची तर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे त्याच्याप्रमाणे या व्हिडिओच्या कॅप्शनची देखील चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. वाचा : Amitabh Bachchan यांनी कॅन्सरग्रस्त अंजलीला दिली खास भेट; अशी केली चिमुकलीची इच्छापूर्ती मिताली तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अधूनमधून प्राण्यांचे फोटो शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी देखील मितालीनं त्यांच्या घरामागील जागेत बिबट्याचा वावर असलेला व्हिडिओ शेअर केला होता. सिद्धार्थ आणि मितालीनं काही बिबट्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. तसेच सिद्धार्थ आणि मितालीने हरीणचा देखील फोटो शेअर केला होता विशेष म्हणजे या दोघांनी शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्यांनी लिहिलेलं कॅप्शन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.
  व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते. यानंतर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी २४ जानेवारी २०२१ ला लग्नगाठ बांधली. मिताली आणि सिद्धार्थ या जोडीचे लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे व लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच त्यांच्या लग्नातील लूकची देखील सोशल मीडियावर रंगली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published: