मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: आमिर खानने कियाराची अशी केली मदत; चाहते म्हणाले Mr. Perfectionist...

VIDEO: आमिर खानने कियाराची अशी केली मदत; चाहते म्हणाले Mr. Perfectionist...

सध्या आमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) चा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात त्याने कियाराची मदत केली आहे.

सध्या आमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) चा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात त्याने कियाराची मदत केली आहे.

सध्या आमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) चा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात त्याने कियाराची मदत केली आहे.

मुंबई 13 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) मिस्टर परफेक्शनिस्ट  (Mr. perfectionist) म्हणून ओळखला जातो. ते अभिनयात असो किंवा बॉडी ट्रान्सफोर्मेशन सगळीकडे तो परफेक्ट दिसतो. इतकचं नाही तर इतरांना मदत करतानाही अग्रेसर पाहायला मिळतो. सध्या त्याचा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) चा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात त्याने कियाराची मदत केली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान कियारा आणि आमिर खान एकच स्टेज वर आले होते. दरम्यान सध्या कोरोना नियमांच पालन करून कार्यक्रम केले जातात त्यानुसार दोघांनीही मास्क घातला होता. तर कॅमेरा समोर त्यांनी मास्क हटवला पण त्यावेळी कियाराचा मास्क तिच्या कानातल्यात अडकतो.

View this post on Instagram

A post shared by ✒ (@perfectaamir)

यावेळी आमिर कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिची मदत करतो. त्यामुळे आमिरच्या चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. इथेही मिस्टर परफेक्शनिस्टची छबी दिसली असं त्याचे चाहते म्हणत आहेत. (Amir khan helps Kiara Advani)

कियारा सध्या तिचा चित्रपट ‘शेरशाह’ (Shershaah) मुळे चर्चेत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सोबत तिची केमिस्ट्री हीट ठरली आहे. 12 ऑगस्ट ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाहिद कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra Biopic) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

याशिवाय अभिनेता आमिर खान त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’ मध्ये व्यस्त आहे. नुकताच तो लडाख हून चित्रपटाचं एक शेड्युल संपवून परतला आहे. अभिनेत्री करीना कपूर देखील या चित्रपटात दिसणार आहे.

First published:
top videos

    Tags: Aamir khan, Bollywood actor, Entertainment