...तर माझंही 'तिहेरी तलाक'ला समर्थन असतं, सरकारच्या निर्णयावर विद्या बालनची पहिली प्रतिक्रिया

...तर माझंही 'तिहेरी तलाक'ला समर्थन असतं, सरकारच्या निर्णयावर विद्या बालनची पहिली प्रतिक्रिया

मिशन मंगल (Mission Mangal) हा भारतासाठी नेहमीच अभिमानाचा क्षण होता. त्यामुळे आमच्या सिनेमासाठी याहून मोठं कोणतंच प्रमोशन असू शकत नाही

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालननं सध्या तिचा आगामी सिनेमा ‘मिशन मंगल’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या दरम्यान ‘न्यूज 18’ ला दिलेल्या मुलाखतीत विद्या सध्या देशभरात चर्चेत असलेल्या विविध मुद्द्यांवर मोकळेपणानं बोलली. यावेळी बोलताना तिनं तिहेरी तलाकाच्या निर्णयावर विशेष भर देत आपली प्रतिक्रिया दिली.

मुलाखती दरम्यान बोलताना विद्या म्हणाली, ‘मिशन मंगल हा भारतासाठी नेहमीच अभिमानाचा क्षण होता. त्यामुळे आमच्या सिनेमासाठी याहून मोठं कोणतंच प्रमोशन असू शकत नाही. मात्र या व्यतिरिक्त देशात सध्या खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर मागच्या काही महिन्यापासून बरेच मोठे निर्णय आपल्या सरकारनं घेतले आहेत. पण जिथंपर्यंत तिहेरी तलाकचा मुद्दा आहे. तर त्यावर मी एकच सांगेन की, मला धर्माच्या गोष्टीबाबत जास्त सखोल माहिती नाही आणि मी सर्व धर्मांचा सन्मान करते. पण महिलासांठी मोदी सरकारनं घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे.’

bigg boss Marathi 2 : काळा मास्क लावून घरात आलेली 'ती' माणसं आहेत तरी कोण?

विद्या पुढे म्हणाली, ‘तुम्ही एकदा स्वतःला त्या जागी ठेऊन पाहा आणि विचार करा की, तुमच्या सुंदर आणि सर्वकाही चांगलं, व्यवस्थित सुरू असलेल्या आयुष्यात अचानक एका रात्री भांडण होतं आणि पती तीन वेळा एक शब्द उच्चारतो आणि तुमचं अस्तित्वच संपून जातं. विचार करा की, तुम्हाला त्यावेळी किती वाईट वाटेल. तिहेरी तलाक हा असाच होता. सरकारनं याबाबत कायदा बनवला ही मुस्लिम महिलांसाठी दिलासादायक गोष्ट आहे. जर एक महिला सुद्धा आपल्या पतीला तीन वेळा तलाक बोलून घटसफोट देऊ शकल्या असत्या तर मी त्याला बरोबरीचा भाग मानलं असतं आणि त्याला पाठिंबा दिला असता. मी सरकारच्या या निर्णयावर खूश आहे. पण माझ्या या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागते.’

International Cat Day फिल्मस्टार्सची नक्कल करणाऱ्या या कॉपी CAT पाहिल्यात?

याशिवाय विद्यानं काश्मीर मुद्द्यावर आपलं मत मांडलं. ती म्हणाली, देशाच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. मागच्या बऱ्याच काळापासून जम्मू-काश्मीर वाद सुरू होता. आता या निर्णयामुळे देश एकत्र होईल असं म्हटलं आहे. पण मी याबाबत एक सांगेन, भौगोलिकदृष्ट्या आपण एकत्र दिसत असलो तरीही तिथल्या लोकांनी हा निर्णय मनापासून स्वीकारायला हवा. त्या लोकांशीही याबाबत बोलायला हवं. ते या निर्णयावर खूश आहेत का नाही हे विचारायला हवं करण तेही आपल्या देशाचाच एक भाग आहेत. त्यामुळे त्यांच्याही आयुष्यात शांतता मिळणं गरजेचं आहे आणि पण त्यांच्या मतांचाही आदर करायला हवा.

...आणि चक्क अक्षय कुमारनं धरले विद्या बालनचे पाय!

===============================================================

VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

First published: August 11, 2019, 8:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading