Mission Mangal टीमचा अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास, पाहा UNSEEN VIDEO

Mission Mangal टीमचा अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास, पाहा UNSEEN VIDEO

Mission Mangal टीमचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला Misiion Mangal सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि अवघ्या 3 दिवसांत हा सिनेमा 100 कोटींचा पल्ला गाठण्याच्या तयारीत या सिनेमासोबत रिलीज झालेला ‘बाटला हाउस’ अक्षयच्या सिनेमाला टक्कर देत असला तरीही मिशन मंगलच्या कमाईमध्ये फारसा फरक पडलेला नाही. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त 5 अभिनेत्रीच्याही भूमिका आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी या सर्वांमधील स्पेशल बॉन्डिंग दिसून आलं. त्यानंतर आता या संपूर्ण टीमचा एक अनसीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये संपूर्ण टीम अंताक्षरी खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

अभिनेत्री विद्या बालननं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ही विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, नित्या मेमन, तापसी पन्नू आणि अक्षय कुमार एका कारमध्ये बसले आहेत आणि बहुदा ते ट्राफिकमध्ये अडकल्याचं दिसून येत आहे. मात्र यावर त्यांनी खूपच हटके उपाय शोधून काढला त्यांनी अंताक्षरी खेळायला सुरूवात केली. त्यांचा हा व्हिडिओ विद्या बालननं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओला विद्यानं ‘अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास’ असं कॅप्शन दिलं आहे. यावर त्यांच्या चाहत्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

गे म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला करण जोहर, अशी केली बोलती बंद

 

View this post on Instagram

 

Antariksh se Antakshari tak ka safar #MissionMangal @akshaykumar @nithyamenen @taapsee @sandhu_aditi

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

याशिवाय विद्यानं अक्षय कुमारच्या एका अनोख्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अक्षय स्वतः एक गाणं तयार करुन स्वतःच्याच चालीनं ते गाताना दिसत आहे. अक्षयचं हे अनोखं गाणं ऐकल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओला ‘चल चल मेरे भाई कल पिक्चर रिलीज होनी है’ असं कॅप्शन दिलं आहे. हे गाणं ऐकल्यावर कोणालाही समजेल की ही संपूर्ण टीम खूपच वाईट प्रकारे ट्राफीकमध्ये अडकल्याचं लक्षात येतं आणि याच परिस्थितीवर हे गाणं अक्षयनं तयार केलं आहे.

दिशाला डेट करतोस का? चाहत्याच्या प्रश्नावर टायगर म्हणाला, माझी लायकी...

 

View this post on Instagram

 

Chal chal mere bhai kal Picture release ho rahi hai ..... @nithyamenen @akshaykumar #MissionMangalMemories .

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

मिशन मंगल हा सिनेमा अशा वीरांची कथा जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे. मिशन मंगल ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं असून या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेमन यांच्याही प्रमुख भूमिका आहे.

कपड्यांमुळे प्रियांका पुन्हा चर्चेत, दिराच्या पार्टीत घातला ट्रान्सपरंट ड्रेस

==========================================================

Zomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL

Published by: Megha Jethe
First published: August 19, 2019, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading