कसा आहे अक्षयचा Mission Mangal, सिनेमा पाहण्याआधी वाचा Review आणि Collection Report

कसा आहे अक्षयचा Mission Mangal, सिनेमा पाहण्याआधी वाचा Review आणि Collection Report

बऱ्याच काळापासून चर्चेत असेलेला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ नुकताच रिलीज झाला. मात्र वीकेंडला सिनेमाचा प्लान करण्याआधी हे वाचाच

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : बऱ्याच काळापासून चर्चेत असेलेला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमानं 29.16 कोटींची बंपर कमाई करत नवा रेकॉर्ड केला. अक्षयच्या स्वातंत्र्य दिनाला रिलीज झालेल्या आतापर्यंत सर्व सिनेमांमध्ये मिशन मंगलनं बाजी मारली आहे. अक्षय व्यतिरिक्त या सिनेमामध्ये 5 अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात इस्रो वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे.

एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीनं तयारी केली जाते याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. अंतराळ यान मंगळ ग्रहावर पाठवणं हे भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. प्रक्षेपणाचा फार काही अनुभव नसतानाही नासाच्या मदतीवर अवलंबून न राहता आणि सर्व बाजूंनी फक्त नकार मिळत असतानाही हार न मानता मिशन मंगल यशस्वी करून दाखवणाऱ्या या वैज्ञानिकांची मेहनत दाखवण्यात आली आहे.

सिनेमाचा हिरो अक्षय कुमार असला तरीही अभिनेत्री विद्या बालन त्याला सगळीकडेच भारी पडताना दिसते. याशिवाय सिनेमतील इतर कलाकार सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेमन, शर्मन जोशी यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. एकूणच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. या सिनेमाला टाइम्स ऑफ इंडियानं तीन स्टार दिले आहेत तर इंडियन एक्सप्रेसनं अडीच स्टार दिले आहेत. याशिवाय न्यूज 18 नं या सिनेमाला साडेतीन स्टार दिले आहेत तर आजतकनेही या सिनेमाला साडेतीन स्टार दिले आहेत. एकंदर या सिनेमात ते सर्व आहे ज्याची प्रेक्षकांना अपेक्षा होती.

अक्षयचे याआधी स्वातंत्र दिनाला रिलीज झालेले सिनेमा

2016: रुस्तम, 14.11 करोड़

2017: टॉयलेट एक प्रेमकथा, 13.10 करोड़

2018: गोल्ड, 25.25 करोड़

2019: मिशन मंगल, 29.16 करोड़

हा सिनमा अशा वीरांची कथा जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे. मिशन मंगल ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं असून या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेमन यांच्याही प्रमुख भूमिका आहे.

==================================================================

इराणमध्ये सुपरहिट तामिळ गाण्यावर होतोय चक्क व्यायाम, SPECIAL REPORT

Published by: Megha Jethe
First published: August 16, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading