Mission Mangal मराठीत रिलीज करण्यास मनसेचा विरोध, 'हे' आहे कारण

Mission Mangal मराठीत रिलीज करण्यास मनसेचा विरोध, 'हे' आहे कारण

मूळ ‘मिशन मंगल’ या हिंदी चित्रपटास किंवा तो प्रदर्शित होण्यास आमचा कोणताही विरोध नाही असं मनसेनं स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : ‘मिशन मंगल’ हा हिंदी चित्रपट मराठीमध्येही डब करुन प्रदर्शित होत आहे, अशाप्रकारे हिंदी सिनेमे मराठीत डब करुन प्रदर्शित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं तीव्र विरोध केला आहे. मूळ ‘मिशन मंगल’ या हिंदी चित्रपटास किंवा तो प्रदर्शित होण्यास आमचा कोणताही विरोध नाही, पण तो मराठीत प्रदर्शित करण्यास आक्षेप आहे. असं मनसे चित्रपट सेनेकडून सांगण्यात आलं.

मराठी चित्रपटांना योग्य प्रमाणात शोज मिळत नाहीत, या मुद्द्यावरुन मनसेचं आंदोलन गेली अनेक वर्षं सुरु आहे. हिंदी सिनेमे जर मराठीत डब झाले तर मूळ मराठी चित्रपटांना शोज मिळण्यात आणखी अडचणी येतील, आणि याच कारणामुळे मनसे अशाप्रकारे हिंदी सिनेमे मराठी डब करुन प्रदर्शित करण्यास विरोध करत असल्याचं मनसे चित्रपट सेनेचं म्हणणं आहे.

फक्त 300 रुपयांत भेटा आवडत्या सेलिब्रिटीला!

महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिक जनतेला हिंदी भाषा समजण्यात काहीही अडचण नाही, असं असताना मूळ हिंदी मराठी भाषेत डब करणे यामागचा तर्क केवळ थिएटरमालकांचा वर्षभरातील मराठी सिनेमांच्या शोजचा कोटा पूर्ण व्हावा असाच आहे. मराठी चित्रपट व्यवसायाची परिस्थिती अशाने आणखी बिकट होऊ शकते, म्हणूनच वेळीच त्याविरोधात आवाज उठवणं गरजेच आहे.

चिमुकलीवर गँगरेप! बलात्काराऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अनुष्काला संताप अनावर

यापूर्वी धोनी सिनेमासुद्धा मराठी भाषेत डब करुन प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला होता पण मनसे आंदोलनाने तो हाणून पाडला होता. एका मराठी मनोरंजन वाहिनीने दाक्षिणात्य सिनेमे मराठीत डब करुन टीव्हीवर दाखवण्यास सुरुवात केली होती, तोही प्रकार मनसेच्या प्रयत्नाने बंद झाला होता.

‘विशिष्ट सिनेमाला आकसाने विरोध करण्याचा आमचा मानस नाही. हिंदी ‘मिशन मंगल’ या चित्रपटाला मनसेच्या शुभेच्छाच आहेत... पण त्याचवेळी आम्ही हेही जाहीर करतो की ‘मिशन मंगल’ मराठीत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झालाच तर मग आम्हालाही ‘मिशन खळ्ळखटॅक’ हाती घ्यावं लागेल.’ अमेय खोपकर (अध्यक्ष, मनसे चित्रपट सेना) यांनी सांगितलं.

गुडघ्याच्या दुखापतीनंतरही स्टंट करणार ही अभिनेत्री, फ्रंट फ्लिपचा VIDEO व्हायरल

'मिशन मंगल' अशा वीरांची कथा जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे. मिशन मंगल ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं असून या सिनेमात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी, नित्या मेमन यांच्याही प्रमुख भूमिका आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

======================================================================

अमित शहांचा उदयनराजेंना फोन, संपूर्ण कॉल रेकॉर्डचा VIDEO

First published: August 2, 2019, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading