मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Mission Majnu Trailer : नॅशनल क्रश करणार बॉलिवूड हिरोबरोबर रोमान्स; रश्मिका मंदानाचं हिंदी ऐकलत का?

Mission Majnu Trailer : नॅशनल क्रश करणार बॉलिवूड हिरोबरोबर रोमान्स; रश्मिका मंदानाचं हिंदी ऐकलत का?

मिशन मजनू ट्रेलर

मिशन मजनू ट्रेलर

सिनेमात जबरदस्त एक्शन सीन्स तर आहेतच मात्र नॅशनल क्रश रश्मिकाबरोबर सिद्धार्थचा रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या चर्चा असल्या तर या चर्चांना मागे टाकत सिद्धार्थच्या नव्या सिनेमाच्या चर्चा सुरू झाल्यात. कारण सिद्धार्थ साऊथ सुंदर नॅशनल क्रश रश्मिका मंदानाबरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अनेक दिवस ज्या सिनेमाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते तो सिनेमा म्हणजे मिशन मजनू. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा जास्त न ताणता मिशन मजनू सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सिनेमातून सिद्धार्थ पुन्हा एकदा देशभक्त म्हणून समोर येणार आहे. सिनेमात जबरदस्त एक्शन सीन्स तर आहेतच मात्र नॅशनल क्रश रश्मिकाबरोबर सिद्धार्थचा रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे. रश्मिकाचं अस्खलित हिंदीची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थचा मिशन मजनू हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. जबरदस्त ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिद्धार्थचे एक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.  सिनेमाचा ट्रेलर हा सस्पेंस आणि एक्शननं भरलेला आहे. सिद्धार्थ यावेळी रॉ एजेंटच्या रुपात देशभक्ती करताना दिसणार आहे.

हेही वाचा - Anupama: अखेर अनुपमा आणि अनुज आले एकमेकांजवळ; दोघांचा 'तो' इंटिमेट सिन व्हायरल

" isDesktop="true" id="811961" >

18 जानेवारीला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आणि रश्मिकाला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री रश्मिका मंदानाचं हिंदी देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आजवर रश्मिकाला इंग्रजी आणि साऊथ इंडियन भाषेत प्रेक्षकांनी ऐकलं आहे मात्र यावेळी तिला पहिल्यांदा हिंदी बोलताना ऐकायला मिळणार आहे.  इतकंच नाही तर रश्मिका आणि सिद्धार्थ यांचे रोमँटिक सीन्स देखील पाहायला मिळणार आहे.

सिनेमाची कथा ही एका सिक्रेट मिशनवर आधारित आहे. जे मिशन आहे पाकिस्तानमध्ये बेकायदेशीरपणे अण्वस्त्रे बनवणं आणि दहशतवाद्यांचा खात्मा करणं. सिद्धार्थ सिनेमात एका रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे. तर रश्मिका मंदाना एका अंध पाकिस्तानी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. मिशन मजनू हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News