दीपिकाच्या 'या' गाण्यावर थिरकली मिस वर्ल्ड मानुषी, पहा हा व्हिडिओ

दीपिकाच्या 'या' गाण्यावर थिरकली मिस वर्ल्ड मानुषी, पहा हा व्हिडिओ

हा व्हिडिओ आहे तिच्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेतला आहे.

  • Share this:

25 नोव्हेंबर : मिस वर्ल्ड 2017 चा किताब पटकवणारी हरियाणाची छोरी मानुषी छिल्लर फक्त तिच्या यशामुळेच नाही तर तिने काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या ट्विटला सडेतोड उत्तर दिल्यामुळेही सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय.

आणि आता तिचा एका डान्स परफाॅर्मन्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट झाला आहे. हा व्हिडिओ आहे तिच्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेतला. या स्पर्धेतला एका फेरीमध्ये मानुषीने अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या गाण्यावर नृत्य केलं आहे. 'नगाडा संग ढोल बाजे' या रामलीला सिनेमातील गाण्यावर तिने नृत्य केलं आहे.

तिच्या सुंदर नृत्यामुळे आणि भारतीय स्टाईलमुळे स्टेजवरील अन्य स्पर्धकही तिच्यासोबत थिरकल्या. त्यामुळे तिच्या या नृत्याला आणखीनच रंग चढला.

तिने नृत्याचं शिक्षण घेतलं असल्यामुळे तिच्या या व्हिडिओमधल्या नृत्याच्या प्रत्येक स्टेप आणि तिच्या अदाकारी टिपण्यासारख्या आहे.

भारतीय पोषाक, त्यावरचे दागिने, तिचा मेक-अप आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिचा आत्मविश्वास या सगळ्याच्या जोरावर ती या यशापर्यंत पोहचली आहे. आणि आपल्या भारताचं नाव मोठ केलं आहे.

First published: November 25, 2017, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading