लेटेस्ट मिस वर्ल्ड करणार दुप्पट वयाच्या अक्षय कुमारसोबत बॉलिवूड पदार्पण

लेटेस्ट मिस वर्ल्ड करणार दुप्पट वयाच्या अक्षय कुमारसोबत बॉलिवूड पदार्पण

अक्षय कुमारच्या सिनेमातून मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : अभिनेता अक्षय कुमार मागच्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यंदाच्य वर्षात 1-2 नाही तर 4 सिनेमा रिलीज झाले. पण याशिवाय त्याचं पुढच्या वर्षीचं शेड्यूल सुद्धा बीझी झालं आहे. त्याच्या आगामी सिनेमांमध्ये लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी, बेलबॉटम यांच्यासह एका ऐतिहासिक सिनेमाचाही समावेश आहे. अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा ऐतिहासिक सिनेमा पुढच्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या सिनेमात मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

मानुषी छिल्लरनं 2017मध्ये मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड हे दोन्ही टायटल जिंकले. त्यानंतर तिचं आयुष्यचं बदललं. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषीला सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या. पण पदार्पणच्या सिनेमात अक्षय कुमारसोबत काम करायला मिळणं ही तिच्यासाठी खूप मोठी संधी आहे. याविषयी बोलताना मानुषी म्हणाली, माझ्यासाठी ही खूपच सन्मानाची गोष्ट आहे की यशराज फिल्मनं मला त्याच्या सिनेमाची हिरोइन म्हणून निवडलं. या प्रवासात मला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. माझं लाइफ मला एखाद्या फेरी टेलसारखं वाटतं. आधी मिस इंडिया नंतर मिस वर्ल्ड आणि आता एवढ्या मोठ्या बॅनरखाली एका ऐतिहासिक सिनेमातील महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला मिळत आहे.

सलमान खानच्या हिरोईनवर आली दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी करायची वेळ!

यशराज फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या पृथ्वीराज सिनेमामध्ये अभिनेता अक्षय कुमार चौहान वंशाचे राजा पृथ्वीराज यांची भूमिका साकारत आहे. तर मानुषी या सिनेमात राजा पृथ्वीराज यांची पत्नी संयोगिता यांची भूमिका साकरणार आहे. मानुषीच्या निवडीबद्दल बोलताना निर्माते सांगतात, या सिनेमासाठी आम्हाला एका नव्या आणि सुंदर चेहऱ्याची गरज होती. मानुषीनं यासाठी अनेकदा ऑडिशन दिल्या आणि प्रत्येक वेळी तिनं बेस्ट परफॉर्मन्स दिला. यानंतर ती आठवड्यातले 6 दिवस रोज रिहर्सल करत आहे तसेच तिला यशराज फिल्मकडून 9 महिन्यांचं ट्रेनिंगही देण्यात आलं आहे.

#पुन्हा निवडणूक? सई, सोनाली, सिद्धार्थपासून सगळ्यांच्या Twitter मेसेजमुळे वाद

पृथ्वीराज सिनेमा चौहान वंशाचे हिंदू क्षत्रिय राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत. त्यांनी याआधी ‘चाणक्य’ मालिकेचं आणि 2003 मध्ये आलेल्या पिंजर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आज या सिनेमाच्या शुटिंगचा मुहूर्त झाला असून मानुषी आणि अक्षयनं यावेळी होम हवन सुद्धा केलं. हा सिनेमा पुढीच्या वर्षी दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'चिंता करू नका मी सर्वांची काळजी घेईन', अभिषेकनं बिग बींना लिहिलेलं पत्र VIRAL

========================================================================

कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

First Published: Nov 15, 2019 06:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading