Home /News /entertainment /

मिस युनिव्हर्स Harnaaz Sandhuला स्टेजवर करावं लागलं म्याऊ..म्याऊ; काय झालं नेमकं, पाहा VIDEO

मिस युनिव्हर्स Harnaaz Sandhuला स्टेजवर करावं लागलं म्याऊ..म्याऊ; काय झालं नेमकं, पाहा VIDEO

पाहा VIDEO... मिस युनिव्हर्स हरनाज संधू सध्या ट्रेंडमध्ये आहे. तिच्या जबरदस्त फोटोंपासून ते दमदार उत्तरांपर्यंत व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता या कार्यक्रमाचा सूत्रधार स्टीव्ह हार्वेही प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर - मिस युनिव्हर्स 2021’चा (Miss Universe 2021) किताब भारताच्या हरनाझ संधूने(harnaaz sandhu) जिंकला आहे. तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे. तिच्या आधी 21 वर्षांपूर्वी लारा दत्ताने(lara dutta) 2000 साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. मिस युनिव्हर्स हरनाझ संधू सध्या ट्रेंडमध्ये आहे. तिच्या जबरदस्त फोटोंपासून ते दमदार उत्तरांपर्यंत व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता या कार्यक्रमाचा सूत्रधार स्टीव्ह हार्वेही प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. लोक त्याला ट्रोल करत आहेत. याचे कारणही खूप खास आहे. याचं कारण जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्टीव्हलाही ट्रोल करू शकता. मिस युनिव्हर्स 2021 च्या कार्यक्रमादरम्यान स्टीव्हने हरनाझला स्टेजवर मांजरीचा आवाज काढण्यास सांगितले होते. स्टीव्हच्या या गोष्टीने त्यावेळी हरनाझलाही आश्चर्य वाटले. स्टेजवर स्टीव्हने हरनाझला विचारले की, मी ऐकले आहे की तू प्राण्यांचा आवाज चांगला काढतीस. तू कोणत्या प्राण्याच आवज चांगाल काढतेस जरा आम्हाला काढून दाखव. स्टीव्हचे बोलणे ऐकून हरनाझ म्हणाली की, ओ गॉड स्टीव्ह, मी मिस युनिव्हर्सच्या मंचावर असे करेन अशी कधी अपेक्षा देखील केली नव्हती. आता मला हे करावे लागेल. माझ्याकडे दुसरा पर्याय देखील नाही. वाचा-कपिल शर्माच्या शोमध्ये सोनाली कुलकर्णी संतापली; मराठी येत नसल्यानं घेतली शाळा यानंतर हरनाझ संधूने मांजराचा म्याऊ..म्याऊ..असा आवाज काढला. या कार्यक्रमाची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून स्टीव्हला ट्रोल करू लागले आहेत. स्टीव्हला फटकारताना एका यूजरने लिहिले आहे की, हे काय होते? इतर स्पर्धकांना त्यांच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आले आणि हरनाझला स्टेजवर मांजरीचा नक्कल करण्यास सांगितले गेले. आता मला हे जाणून घ्यायचे आहे की, हरनाझसाठी हा प्रश्न कोणी लिहिला होता? नेटकऱ्यांनी स्टीव्हच्या प्रश्नाला मूर्खात काढले आहे. मात्र लोकांनी हरनाजचे कौतुक केले आहे. लोकांचे मत आहे की, हरनाझने त्यावेळी परिस्थिती चांगली हाताळली. तिच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक होत आहे. वाचा-बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवल्यानंतर हरनाझवर भारतासह जगभरातून वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रेटींसह राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे. यानंतर सोशल मीडियावर हरनाझ संधू असा टॅगही ट्रेंड झाला होता.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या