Home /News /entertainment /

मेक्सिकोनं केली भारतावर मात; ही तरुणी ठरली यंदाची ‘मिस युनिव्हर्स’

मेक्सिकोनं केली भारतावर मात; ही तरुणी ठरली यंदाची ‘मिस युनिव्हर्स’

मॅक्सिकोनं गेल्या 69 वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदा मिस युनिव्हर्स या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.

    मुंबई 17 मे: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित मिस युनिव्हर्स (Miss Universe 2020) ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली. यंदाचं या स्पर्धेचं हे 69 वं वर्ष होतं. या स्पर्धेत मेक्सिकोच्या अँड्रा मेझा (Andrea Meza) हिनं बाजी मारली आहे. तिनं मिस युनिव्हर्सच्या सोनेरी मुकुटावर आपलं नाव कोरलं. 2019 मधील विजेता झोजीबिनी तुंझी (Zozibini Tunzi) हिच्या हस्ते तिला सन्मानित केलं गेलं. जगभरातून सध्या या सौंदर्यवतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मॅक्सिकोनं गेल्या 69 वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदा मिस युनिव्हर्स या किताबावर आपलं नाव कोरलं आहे. नुशरतकडे घराचं भाडं भरण्यासाठी नव्हते पैसे; आज आहे कोट्यवधींची मालकीण कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पुढे ढकलून यंदाच्या वर्षी घेण्यात आली. जगभरातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु यापैकी केवळ चारच तरुणींना अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली. अतिम फेरीत ब्राझिलची जुलिया गामा (Julia Gama), पेरुची जॅनक मसिट (Janick Maceta), भारताची अँडलिन कॅसलिनो (Adline Castelino) आणि मेक्सिकोची अँड्रा मेझा (Andrea Meza) यांची जोरदार टक्कर झाली. परंतु ब्राझिल, पेरु आणि भारतावर मात करत मेक्सिकोनं विजेता पदावर आपलं नाव कोरलं. अँड्राने मेक्सोकोसाठी पाचव्यांदा मिस युनिव्हर्स ही स्पर्धा जिंकली. अँड्रावर संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bold photoshoot, Entertainment, International

    पुढील बातम्या