Miss Universe 2019: बिकिनी राउंडवेळी पाय घसरून पडली स्पर्धक, VIDEO VIRAL

Miss Universe 2019: बिकिनी राउंडवेळी पाय घसरून पडली स्पर्धक, VIDEO VIRAL

Miss Universe 2019 मध्ये भारताकडून सहभागी झालेली वर्तिका सिंह टॉप 10 पर्यंतही पोहोचू शकली नाही.

  • Share this:

मुंबई, 09 डिसेंबर: Miss Universe 2019 स्पर्धेतीस एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पर्धेकाने स्विमसूट राऊंडमध्ये कंटेस्टंट एकामागून एक रॅपवॉक करत येत आहेत. यावेळी एक स्पर्धेक रँप वॉक संपवून जात असताना तोल जाऊन खाली पडल्याचं पाहायला मिळालं. यंदा Miss Universe 2019 चा मान साउथ अफ्रिकेच्या सुंदरीनं पटकावला आहे. अमेरिकेतील अटलांटा इथे रविवारी 68व्या Miss Universe स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या महासोहळ्यात जगभारतील एकूण 90 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. या सगळ्या सौंदर्यवतींना मागे टाकत Miss Universe 2019 होण्याचा बहुमान साऊथ अफ्रिकेच्या जोजिबिनी (Zozibini Tunzi)तुंजीने पटकावला आहे. भारताकडून सहभागी झालेल्या वर्तिका सिंहला मात्र टॉप 10पर्यंतही जाणं शक्य झालं नाही.

स्पर्धकाने रँपवॉकदरम्यान तोल जाऊन पडल्याचा व्हिडिओ मिस फ्रान्स माएवा कूचने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की स्विमसूट राऊंडदरम्यान स्पर्धक रँपवॉक संपवून जात असताना घसरून पडली. मात्र तिने आपला आत्मविश्वास डगमगू दिला नाही. प्रेक्षकांमधून वेगवेगळ्या कमेंट्स येत असतानाही ती पूर्ण आत्मविश्वासानं पुन्हा उभी राहिली आणि त्याच जोमात उभं राहून रँपवॉक पूर्ण केला. मिस माएवा एकटी नव्हती जी रँपवॉक दरम्यान घसरून पडली होती. तिच्यासोबत आणखी काही प्रतिस्पर्धकही रँम्पवॉकवर घसरून पडले होते.

या रँम्पवॉकदरम्यान रंजकबाब अशी होती की सर्व प्रतिस्पर्धक एकाच ठिकाणी घसरून पडत होते. त्यानंतर केलेल्या अभ्यासावरून असं लक्षात आलं की स्पर्धेक घसरून पडावेत यासाठी जाणीवपूर्व रँम्पची रचना करण्यात आली होती.

View this post on Instagram

 

PRELIMINARY SHOW - Hier soir j’ai vécu la pire hantise d’une Miss : tomber sur scène. Jusqu’ici ça ne m’était jamais arrivé, mais la vie nous réserve parfois des bonnes comme des mauvaises surprises. Il faut tirer une leçon de chaque expérience, et la leçon que j’en tire est que tomber et se relever est le principe même de la vie d’une femme, le principal c’est d’avancer peu importe les obstacles. Si tu tombes 9 fois relèves toi 10 fois et garde la tête haute ! Nos expériences nous font grandir, mûrir et nous rendent plus forte. 💪🏼 Je tiens à vous remercier pour vos messages et à vous rassurer je ne me suis pas blessée. Merci pour votre soutien, je vous aime ❤️❤️❤️ PRELIMINARY SHOW - Last night I experienced the worst obsession of a Miss: falling on stage. So far it has never happened to me, but life sometimes gives us good as bad surprises. A lesson must be learned from each experience, and the lesson I draw from it is that falling and standing up is the very essence of a woman's life, the main thing is to move forward regardless of obstacles. If you fall 9 times raise 10 times and keep your head high! Our experiences make us grow, mature and make us stronger. 💪 I want to thank you for your messages and to reassure you I did not hurt myself. Thank you for your support, you are the best ❤ #missuniverse #missuniverse2019 #missfrance #staystrong #keepyourheadup #thankyou #proud

A post shared by Maëva Coucke (@maevacouckeoff) on

मिस फ्रान्स माएवाने स्विमसूट राउंडमध्ये आपल्यासोबत झालेल्या या दुर्घटनेचा व्हिडिओ इन्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. धडपडलं तरीही पुन्हा जोमानं उठून उभं राहणं हे महिलांच्या जीवनाचं सार आहे असं माएवाने इन्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे. या घटनेतून हे आम्हाला शिकायला मिळालं. भारताकडून यावेळी वर्तिका सिंहने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र वर्तिका टॉप 10मध्ये जाण्याचा मानही मिळवण्यात कमी पडल्यानं चाहत्यांमध्ये निराशा आहे. या आधी भारताकडून विश्व सुंदरी होण्याचा मान सुष्मिता सेन, लारा दत्ता, मानुषी छिल्लर यांनी मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 12:47 PM IST

ताज्या बातम्या